नामदेव जाधव यांना खुश करण्यासाठी महापालिकेची स्मार्ट खेळी; दहा लाखांची पुस्तक खरेदी करणार

Namdev Jadhav : महापालिकेत सतत आंदोलने किंवा अधिकाऱ्यांचे केबिन बाहेर राहून त्यातील त्रुटी दाखवणाऱ्या लेखक नामदेव जाधव यांना खुश करण्यासाठी

Pimpri Chinchwad Municipal Corporation

Namdev Jadhav : महापालिकेत सतत आंदोलने किंवा अधिकाऱ्यांचे केबिन बाहेर राहून त्यातील त्रुटी दाखवणाऱ्या लेखक नामदेव जाधव यांना खुश करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठी खेळी केली आहे. जाधव यांनी लिहिलेल्या ‘शिवराय’ या पुस्तकाच्या पाच हजार प्रती दहा लाख पन्नास हजार रुपयांना खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांच्या व्यापक कार्याचा प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पुस्तक खरेदी केल्याचे सांगितले आहे. पुस्तक खरेदी करण्याबाबत ४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर माहिती व जनसंपर्क विभागाने शिक्षण विभागाचा अभिप्राय मागवला होता. माध्यमिक शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०२५ रोजीच या पुस्तकाबाबत अभिप्राय दिला होता. मात्र, पुस्तकाची खरेदी रखडली होती.

महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आयुक्तांनी ४ मार्च २०२६ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, सदर खर्च शिक्षण विभागाच्या तरतुदीतून करण्यात येणार आहे. या खर्चासाठी आता स्थायी समितीची अंतिम मान्यताही दिली आहे. त्यामुळे आता लवकरच ही पुस्तके पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पुस्तकातील ५१ प्रकरणांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीचा, वैज्ञानिक दृष्टीचा, तसेच आर्थिक व प्रशासकीय कारभाराचा इतिहास अभ्यासणे विद्यार्थ्यांसाठी योग्य ठरेल, असा अभिप्राय शिक्षण विभागाने दिला होता.

IND vs ZIM : IPL नंतर ‘या’ संघाशी भिडणार भारतीय संघ, जुलैमध्ये करणार दौरा; वेळापत्रक जाहीर

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात नामदेव जाधव यांनी महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम हाती घेतली होती. त्यांनी ‘भ्रष्टाचार खणा आणि नगरसेवक बना’ या मोहीमे खाली प्रशासनाची झोप उडवली होती. त्यानंतरच या पुस्तकांची खरेदी झाल्याचे बोलले जात आहे. जाधव यांना शांत करण्यासाठीच महापालिकेने ही स्मार्ट खेळी केल्याची चर्चा आहे.

follow us