Pune : प्रियकराच्या मनात संशयाचा सूर, प्रेयसीचा केला चाकूने खून; सहा वर्षांच्या लव्हस्टोरीचा The End!

पुण्यात प्रियकराने प्रियसीचा वाढदिवसाच्या दिवशीच चाकूने सपासप वार करुन हत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीयं.

Pune Crime News

Pune Crime News : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमसंबंधातून प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना घडलीयं. दि. 10 ऑक्टोबरला प्रेयसीचा वाढदिवस असल्याने प्रियकराने तिला वाकडच्या लॉजवर नेले. याच लॉजवर त्यांनी केक कापला आणि त्याच चाकूने प्रियकराने तिच्यावर सपासप वार करुन हत्या केलीयं. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीयं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती म्हणून लढवणार का?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

प्रेयसी पुण्यातील डी. मार्टमध्ये नोकरी करत होती. तर आरोपी दिलावर सिंग हा हॉटेल व्यावसायिक होता. सहा वर्षांपूर्वी त्यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झालं. मेरी हिचा 10 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असल्याने दिलावरने तिला वाकड इथं लॉजवर नेलं.

पोलिसांच्या माहितीनुसार प्रेयसीचं दुसऱ्याच कोण्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचा संशय आरोपी दिलावरला होता. प्रेयसी दुसऱ्यासोबत लग्न करणार असल्याचा संशय दिलावरला आला होता. शनिवारी त्याने पिंपरीमधील काळा खडक येथे तिला लॉजवर नेले.

ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा अतिरिक्त 100 टक्के टॅरिफ! अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणुकदारांनी दीड लाख कोटी डॉलर्स गमावले

या लॉजवर दोघांनीही एकत्रितपणे वाढदिवसाचा केक कापला. केक कापल्यानंतर दिलावरने प्रेयसीचा मोबाईल चेक केला, आणि भलतंच समोर आलं. प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबतचे नग्न फोटो दिलावरने पाहिले आणि रागाच्या भरात दिलावरने ज्या चाकूने वाढदिवसाचा केक कापला होता, त्याच चाकून प्रेयसीवर सपासप वार करुन तिची निर्घूणपणे हत्या केली.

दिलावरने प्रेयसीची हत्या केल्यानंतर थेट कोंढवा पोलिस ठाणे गाठले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली असून सध्या आरोपी दिलावर सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

आमच्या मुलाला खोट्या गुन्ह्यांत अडकवलं! निलेश घायवळच्या आई-वडिलांचे गंभीर आरोप, राजकारणी…

सहा वर्षांपूर्वी झाली होती ओळख….
दिलावर सिंग याची प्रेयसीसोबत सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीत त्यांच्यात मैत्री झाली, या मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. त्यानंतर दोघांमध्ये गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होतं. मात्र, अचानक दिलावरच्या मनात आपल्या प्रेयसीबद्दल संशयाचा सूर आल्याने त्याने तिचा खून केलायं.

follow us