पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्तविभाग बंद करण्याच्या निर्णयाला प्रसारण मंत्रालयाची स्थगिती

पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्तविभाग बंद करण्याच्या निर्णयाला प्रसारण मंत्रालयाची स्थगिती

Pune Akashwani updates : आता पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने (Union Ministry of Broadcasting) पुण्यातील आकाशवाणीवरून (Pune Aakashwani) प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. माहिती प्रसारण मंत्री अऩुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय बारगळला असल्याचे चित्र आहे. (Postponing decision to move Pune Akashvani regional news department)

प्रसार भारतीने देशातील सर्वात जास्त श्रोते असलेल्या पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करून ती जबाबदारी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सोपवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार होती. 19 जूनपासून छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आकाशवाणीचे प्रादेशिक व राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश देण्यात आले. या निर्णयावर प्रचंड नाराजी व्यक्त झाली होती. सोशल मीडियावर सर्वसामान्य श्रोत्यांकडून या निर्णयाला मोठा विरोध झाला. या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त झाल्यानंतर सरकारला हा निर्णय स्थगित करून  एक पाऊल मागे यावे लागले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

Asian Games 2023: भारताला मोठा धक्का, हिमा दास आशियाई स्पर्धेतून बाहेर 

आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना 1953 मध्ये झाली. त्यानंतर मराठी बातम्यांचा प्रादेशिक व राष्ट्रीय वृत्त विभाग सलग 40 वर्षे पुण्यात कार्यरत आहे. पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम दररोज 224 लाखांहून अधिक श्रोते ऐकतात. अशा परिस्थितीत पुणे वृत्त विभागात वृत्त प्रमुख म्हणून काम करण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नसल्याचा कारण देत प्रसार भारतीने संपूर्ण वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यसभा खासदार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयासंदर्भात ठाकूर यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली.

पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा निर्णय रद्द करावा, यासाठी त्यांनी प्रसार भारतीचे अपूर्व चंद्रा आणि सीईओ द्विवेदी यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube