मानाची गदा मोहोळ कुटुंबाची पण महाराष्ट्र केसरीला मिळणाऱ्या फॉर्च्युनरचं गुपित काय? आयोजकांनी सांगितलं नावं

Fortuner Maharashtra Kesari स्पर्धेची खासियत जाणून घेण्यासाठी लेट्सअपने सातव यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

Fortune Maharashtra Kesari

Prestigious mace by Mohol but secret of Fortuner Maharashtra Kesari gets organizers revealed the names : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघच्या वतीने पुण्यातील वाघोलीमध्ये राज्यातील मनाच्या अशा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेची सुरुवात 18 ते 22 मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन रामकृष्ण सातव पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा कशी असणार तिची खासियत काय? हे सर्व जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीने सातव यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती दिली.

मराठमोळ्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग! केवळ 33 हजारांत बनवला 80 मिनिटांचा सिनेमा

यावेळी बोलताना सातव म्हणाले की, या स्पर्धेचं आयोजन करताना आम्ही 2023 मध्ये झालेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचा आदर्श समोर ठेवला आहे. तर विजेत्याला थेट फॉर्च्युनर देण्याचं कारण सांगताना सातव म्हणाले की, वाघोली हा भाग खेळांवर प्रेम करणारा आहे. प्रत्येक घरात एक तरी पैलवान असतोच. त्यामुळे नेते, प्रतिष्ठीत मंडळी आणि लोकं यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्यांनीच विजेत्याला फॉर्च्युनर देण्याचं ठरवलं.

अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेल्यांना दिलासा! सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांची महत्त्वाची घोषणा

तसेच या स्पर्धेच्या इतिहासाप्रमाणे गेल्या 68 वर्षांपासून पारंपारिक मोहोळ कुटुंबाकडून विजेत्याला चांदीची गदा दिली जाते. दरवर्षी त्यामध्ये काही ना काही बदल असतो. यंदा देखील चांदीचा भाव जरी वाढलेला असला तरी देखील या गदेतील चांदी वाढलेलीच असणार असा विश्वास आयोजक सातव यांनी व्यक्त केला. ही गदा मानाची गदा असते.

वाघोलीतील महाराष्ट्र केसरी स्पर्धेची खासियत काय?

वाघोलीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी 50 हजार लोकांच्या क्षमतेचं स्टेडिअम बनवलं जात आहे. तसेच क्रीडा नगरीला स्व. अजित पवारांच नाव दिलं गेलं आहे. या स्पर्धेची आणखी खासियत म्हणजे मातृशक्तीला वंदन या थीमच्या अंतर्गत स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Iran Israel War : युद्धाच्या झळा स्वयंपाक घरापर्यंत, सरकारचं काय चुकलं? पेट्रोल-डिझेलप्रमाणे एलपीजी स्टोअर का केला नाही?

स्पर्धेच्या समारोपाला आणि बक्षीस वितरण समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितअसणार आहे. यंदा सर्वात मोठ बक्षीस ठेवण्यात असून विजेत्याला फॉर्च्युनर उपविजेत्याला स्कॉर्पिओ आणि इतर विजेत्यांना 18 बुलेट आणि 18 स्प्लेंटर गाड्या मिळणार आहेत. स्पर्धेची सुरुवात 18 ते 22 मार्च दरम्यान होणार आहे.

follow us