पुण्यात प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच आयोजन

Dr. Sudhakarrao Jadhav Trophy Competition : युवा पिढीतील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता पुण्यामध्ये प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आणि सृजनसभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वा प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. (Trophy) दिनांक २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान नऱ्हे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व, लोकगीत गायन, वादविवाद, पथनाटय, छोटा ख्याल गायन, नाटयगीत गायन व एकल तबला वादन या प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. उद्घाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा होणार असून भारत विश्वगुरु होणार, वंदे मातरम् राष्ट्रीय गीत, तिसरे महायुद्ध? असे विषय आहेत. तर, लोकगीत गायन स्पर्धेत भारुड, भजन, पोवाडा सादरीकरण देखील याच दिवशी होणार आहे. तसंच स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे निबंधलेखन स्पर्धा व कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
पुण्यात राज्यपाल तर, रायगडमध्ये अदिती तटकरे; 15 ऑगस्टला कुठे कुणाच्या हस्ते ध्वजारोहण, वाचा लिस्ट
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, वादविवाद व पथनाटय स्पर्धा शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० पासून सुरु होणार आहेत. वादविवाद स्पर्धेकरीता आणीबाणी योग्य की अयोग्य?, धार्मिक कट्टरता आणि पेहेलगाम हे विषय असणार आहेत. तसंच, पथनाटय स्पर्धेसाठी मतदान माझा हक्क आणि कर्तव्य या विषयावर सादरीकरण करण्याची मुभा स्पर्धकांना असणार आहे. तसंच, शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छोटा ख्याल गायन, नाटयगीत गायन व एकल तबला वादन स्पर्धा होईल.
सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला १५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकाला ७ हजार ७७७ रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावणाऱ्या रुपये ११११ व चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील संघांनी सहभागी होणार असून नोंदणी सुरु आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धेत सहभागाकरिता ७९७२४८३५७५, ९९२३५३७४३६, ९११२४४५२८४ , ९२८४३८३१२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे.