धक्कादायक, पुण्यात बदलापूर पार्ट 2, शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

धक्कादायक, पुण्यात बदलापूर पार्ट 2, शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Pune News : बदलापूरच्या (Badlapur Case) एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित देखील केला आहे.

तर दुसरीकडे पुण्यातील (Pune) एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार पुण्यातील भवानी पेठ परिसरात असणाऱ्या एका नामांकित शाळेत 15 ऑगस्टच्या दिवशी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तर आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. देवराज पदम आग्री (वय 19) असे आरोपीचा नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. समर्थ पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भवानी पेठ परिसरात असणाऱ्या एका नामांकित शाळेत 15 ऑगस्टच्या दिवशी पीडित मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली असता आरोपी मुलगा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता.

पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने मुलीचा हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले मात्र पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत तिकडून पळ काढला आणि घरी येऊन तिने आईला संपूर्ण प्रकार सांगितला.

बदलापूर प्रकरण, महिला पत्रकारांशी बोलताना वामन म्हात्रेंची जीभ घसरली, म्हणाले, तुझ्यावरच बलात्कार … 

त्यानंतर आईने समर्थ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विरोधात 74, 75 (1) (i) पोक्सो 8 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube