पुणे कोर्टाबाहेरील थरारातील जखमी हा चव्हाण हत्येतील आरोपी तर, हल्लेखोरांचीही ओळख पटली
Pune court shooting मधील जखमी व्यक्तीसह हल्लेखोरांची ओळख पटली असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune court shooting Injured person accused in Chavan murder case assailants also identified : पुणे शहरातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर दिवसाढवळ्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याचा थरार पाहायल मिळाला. यामध्ये टोळक्याने एकावर अत्यंत निर्घृण हल्ला केला. यामध्ये जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याची ओळख समोर आली आहे. तर हल्लेखोरांची देखील ओळख पटल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.
बीडमध्ये दुष्काळाचा विळखा घट्ट; शेतकरी संकटात, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
प्राथमिक माहितीनुसार रक्तरंजित थरारामध्ये गंभीर जखमी झालेला व्यक्तीचं नाव हे मंदार मारुती किवळे असं आहे. तो 20 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जमिनीच्या/आर्थिक वादातून झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी आहे. चार दिवसापूर्वी तो कारागरातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असता, त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे यावर पुण्याचे क्राईम डीसीपी यांनी यावर माहिती दिली त्यांनी सांगितलं की, जखमीवर उपचार सुरू आहे. तसेच आरोपी हे 4 ते 5 जण होते. हल्लेखोरांची ओळख पटली आहे. त्यावर पुढील तपास सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती पुणे पोलीस सहआयुक्त संजय दराडे यांनी दिली.
यामध्ये शुभम चव्हाण हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. यात शुभम चव्हाणचा भाऊ अक्षय चव्हाण यानेच या हत्येचा कट रचल्याचं सांगण्यात येत आहे.