धक्कादायक! पुण्यात कबुतराची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्ठा
Pune Crime: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यात आता थेट कबुतर चोरले म्हणून एका टोळक्याने हत्यार घेऊन फिरत दहशत निर्माण करत अल्पवयीन मुलाला कबुतराचीच विष्ठा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज भागात 25 जुलैला हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. (Pune Crime fed pigeon dropping to Miner boy due to Theft pigeon )
IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेतून बाहेर
या मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यातील तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात गणेश दोडमणी, ओम पंडित, अमोल दास यांचा समावेश आहे.
MIDC ची मागणी करतोय तर तुमच्या पोटात का दुखतं?, NCP कार्यकर्त्यांचा शिंदेना थेट सवााल
काया नेमकं प्रकरण?
पुण्यातील कात्रज भागात या अल्पवयीन मुलाने आरोपींचे कबुतर चोरले होते. याचा राग मनात ठेवत या आरोपींनी या मुलाचा शोध घेण्यासाठी परिसरात हत्यार घेऊन दहशत माजवली. कोणी मध्ये आलं तर त्याला तोडून टाकेल अशी धमकी या तरूणांनी दिली. तर या मुलाला गाडीवर घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर त्याला एका ठइकाणी नेऊन कबुतराचीच विष्ठा खाऊ घातली. तसेच त्याला कोणाला न सांगण्याची धमकी देण्यात आली. पण त्याने हा प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
दरम्यान पुण्यात टोळक्यांचे धुडगूस घालण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी सिंहगड रोडवरील खडकवासला येथील हॉटेलची तोडफोड करून लुटमार करणाऱ्या वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली आहे. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं सांगत संबंधित गुन्हेगार खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात दहशत माजवत होता. त्या रस्त्यावरून पोलिसांनी त्यांची धुलाई करत धिंड काढली.