Pune Car Accident : विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टात काय घडलं?

  • Written By: Published:
Pune Car Accident : विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टात काय घडलं?

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) न्यायालायाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी (दि.22) रोजी पुणे सत्र न्यायालयाने विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी अग्रवालला न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी केलेली सात दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगत विशाल अग्रवालची रवाननगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली आहे. मात्र, पोलिसांना इतके दिवस तपासासाठी का लागतात? असा युक्तिवाद अग्रवालच्या वकिलांनी केल्यानंतर न्यायालयाने अग्रवालला पुढील तपासासाठी 14 दिवस पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने दोन पब मालक आणि इतर तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Pune Kalyani Nagar Car Accident Builder Vishal Agrawal Sent Judicial Custody For 14 Days )

Pune Accident वर रॅप व्हिडीओ करणारा समोर; अल्पवयीन मुलाच्या आईनेही दिलं होतं स्पष्टीकरण

कोर्टात नेमकं काय घडलं?

मागील वेळी विशाल अग्रवालला न्यायालयात नेत असताना काही जणांना त्याच्यावर शाईफेक केली होती. त्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे आज (दि.24) अग्रवालला न्यायालयाच्या मागील गेटने नेण्यात आले. त्यानंतर सुनावणी पोलिसांनी अल्पवयीन तरुणाचा मोबाईल आत्ताच मिळाला आहे. तसेच विशाल अग्रवाल याची देखील पुन्हा चौकशी करायची करायची आहे. काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आणखी सात दिवसांची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. याशिवाय पुरावे नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला याचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे चौकशीसाठी आणखी सात दिवासांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले. मात्र, ही मागणी फेटाळत कोर्टाने विशाल अग्रवालची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालायाच्या या निर्णयामुळे आता विशाल अग्रवालचा  जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणात शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, प्रत्येक गोष्टीवर…

अग्रवालच्या वकिलांचा युक्तीवाद काय?

पुणे पोलिसांनी वाडीव सात दिवासांच्या पोलीस कोठडीला विशाल अग्रवालच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, 420 कलम लावणे किंवा इतर कारणे, टॅक्स न भरणे हे काही पोलीस कोठडी वाढवण्याचे कारण होऊ शकत नाही. घरच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर आधीच जप्त केला आहे. पहिल्यावेळी पोलीस कोठडी मागितली होती. ⁠तसेच दोन्ही पबचे सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांकडे आहे. त्यामुळे विशाल अग्रवालची पोलीस कोठडी वाढवण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

बील भरण्याचे 47 हजार कुठून आले मुलाकडे, यासाठी कोठडीची गरज नाही. ⁠सीसीटीव्ही फॅारेन्सिक टेस्ट करायची असेल पोलिसांना तर त्यासाठी पोलीस कोठडी कशाला हवी, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. कोझी क्लबचा रेंट ॲग्रिमेंट रजिस्टर आहे. ते ॲानलाईन मिळू शकते.पीडित मुलाच्या मित्रांची चौकशी करायची असेल. त्यांच्या बरोबर कोण होते याची माहिती घ्यायची असेल. तर त्यात मुलाचे वडील आणि इतर आरोपी यांचा काय संबंध आहे.⁠ या सर्वांसाठी पोलीस कोठडी आवश्यक नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलाय.

 होय, माझी चूक झाली; विशाल अग्रवालची पोलिसांसमोर कबुली

कल्याणी नगर परिसरात अलिशान गाडीने दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालचा जामीन रद्द करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तर, त्याचे वडील विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यादरम्यान विशाल अग्रवालची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी विशाल अग्रवालने अल्पवयीन मुलगा वेदांतला गाडी देऊन चूक केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे.

जुन्या प्रकरणात आजोबांचीही चौकशी

एका जुन्या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना काल (दि.23) चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. हिट अँड रन प्रकरणाच्या तपासादरम्यान अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे गुन्हे शाखेने वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीसाठी बोलावल्याचे बोलले जाते.

धंगेकरांचं खळबळजनक ट्विट! पबमधील फोटो शेअर करत म्हणाले, “४८ तासांच्या आत…”

2007 आणि 2008 मध्ये भावाशी संपत्तीवरून वाद असल्याने सुरेंद्र अग्रवाल यांनी बँकाकला जाऊन छोटा राजनची भेट घेतली होती आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी छोटा राजनला दिली होती. या प्रकरणात त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी या प्रकरणात मकोकाच्या अंतर्गत एफआयआर दाखल न करता विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केल्याने पोलिसांच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणात  सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

पोर्श अपघात प्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार, आयुक्तांनी दिले आदेश

कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. दोन एफआयआर का नोंदवण्यात आले कोणी दबाव आणला का? त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी कधी करण्यात आली? आदी गोष्टींचा तपास होणार आहे. याशिवाय, अल्पवयीन मुलाला व्हीआयपी सेवा दिल्याबद्दलही पोलिसांची चौकशी होणार आहे. या चौकशीत पोलिस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

Pune Accident : “ब्लड रिपोर्टची गरज नाही, आमच्याकडे त्याहून मोठा पुरावा”: अमितेश कुमार

गुन्हा दाखल झाल्यानंतर अग्रवाल फरार झाले होते

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना अटक केली.

बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा

मुलगा अल्पवयीन आहे याची माहिती असताना देखील त्याला कार चालवायला दिली तसेच तो दारू पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिली. या कारणांमुळे विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाला रेस्टॉरंटमध्ये मद्य देणाऱ्या रेस्टॉरंटसह त्याच्या वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पब’वाल्याची नाही, डॉक्टरची चौकशी होणं गरजेचं; पुणे अपघातप्रकरणी सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

अल्पवयीन मुलगा मद्य घेत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनाही होती. त्याला मद्य पिण्यास परवानगी देण्यात आल्याप्रकरणी वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलायं. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा तपास सुरु असल्याचं पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांचा शोध सुरु होता. मात्र, ते फरार झाले असल्याचं समोर आलं होतं.

अजब शिक्षेवर चहूबाजूंनी टीका

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात आलिशान कार चालवत दोघांना चिरडले. त्यानंतर अल्पवयीन मुलास बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला होता. तसेच 14 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याबरोबरच अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अजब शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या आदेशानंतर चहुबाजूकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यानंतर बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज