…त्यानंतर फडणवीसांना नमस्कार घालायलाही माणूस राहणार नाही; धंगेकरांचा घणाघात

…त्यानंतर फडणवीसांना नमस्कार घालायलाही माणूस राहणार नाही; धंगेकरांचा घणाघात

Lok Sabha Election : लोकसभेच्या मैदानात भाजप आणि काँग्रसमध्ये चांगलेच वार प्रतिवार सुरू आहेत. देशभरातील सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. तर काँग्रेसनेही मोदींवर चांगलेच हल्ले चढवले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

 

त्या दिवशी त्यांना नमस्कारही कुणी करणार नाही

कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचार झाला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. या काळात बॉडीबॅग घोटाळा झाला. त्याचबरोबर उबाठा गट कफन चोर आहे असंही फडणवसी म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कामाच आजही कोतुक होतं. परंतु, फडणवीस असे नेते आहेत की, ते ज्यादिवशी राजकारण सोडतील त्यानंतर त्यांना नमस्कार करायलाही कुणी शिल्लक राहणार नाही. असा थेट घणाघात धंगेकरांनी केला आहे. तसंच, सत्ता असल्यामुळेच आज लोक त्यांना नमस्कार करतात असही ते म्हणाले.

 

सर्वात जास्त पैसा भाजपकडे

धंगेकर म्हणाले, देशभरात सर्वात श्रीमंत पक्ष कोणता असेल तर भाजप हा पक्ष आहे. तसंच, 70 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने १० वर्षात करून दाखवलं आहे असा टोला धंगेकर यांनी लगावला. तसंच, आज सर्वात जास्त पैसा भाजपकडे आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं त्याचं आजही नावं काढलं जात. त्या कामंच श्रेय महाविकास आघाडीला जातं. तरीही फडणवीस आरोप करतात. ते त्यांच काम आहे. कारण ते कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करू शकतात असा टोलाही धंगेकर यांनी लगावला होता.

 

डोळ्यात पाणी येईपर्यंत त्यांना त्रास दिला

यावेळी धंगेकर यांनी अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं. धंगेकर म्हणाले, अजित पवार हे कोणत्या परिस्थितीत भाजपाबरोबर गेले हे सर्वांना माहित आहे. पवार कुटुंब हे एकत्र कुटुंब होत. त्यामध्ये फूट पडू नये असं माझ्यासह अनेकांना वाटत होतं. मात्र, अजित पवारांना प्रचंड त्रास दिला. त्या त्रासामुळे त्यांना भाजपसोबत जावं लागलं असंही अजित पवार म्हणाले. तसंच, अजित पवारांच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत त्यांना त्रास दिला गेला असा दावाही अजित पवार यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज