Video : पुण्यातील प्रभाग क्रमांक 12 मधून युवा उमेदवार ऋषिकेश जाधवचं भाजपला थेट आव्हान
अनेकजण असे आहेत जे निवडून आल्यानंतर साध फिरकतही नाहीत. अशा लोकांना आपण का निवडून देत आहोत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
काही वर्षांपासून माझ्या कुटुंबातील माझ्या काकी राजकारणार होत्या. (Pune) त्यांचं राजकारण मी पाहत आलो आहे. त्यांच्या कामातूनच मी प्रेरणा घेतली. मलाही वाटलं आपण राजकारणात जाव, लोकांच्या प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. अनेक प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत त्यामुळे मी महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असं मत युवा उमेदवार ऋषिकेश जाधव यांनी व्यक्त केलं आहे. ते लेट्सअपवर बोलत होते.
मी काँग्रेस पक्षाकडं माझी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. पक्षाचा पाठिंबा मिळेलं असंही मला वाटत असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता निवडणूक लढवून आता लोकांची ड्रेनजची काम, पाण्याची व्यवस्था, रोजच्या जगण्यातील समस्या हे सगळे प्रश्न सोडवण्याची माझी तयारी आहे असंही ते यावेळी म्हणाले.
आता माझाच प्रभाग नाही तर सर्वच निवडणुकांत आता पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. परंतु, हा पैसा जो तुम्हाला मिळतो तो किती काळ तुमच्याकडं राहणार आहे. किंवा तो तुम्हाला किती पुरणार आहे याचा विचार लोकांनी करावा असं म्हणत तुम्ही मला साथ दिली तर मी नक्की या पैशांपेक्षा चांगलं काम करेलं असही ते म्हणाले.
ठाकरेंचे जाहीरनामे फक्त कागदावरच; ठाकरे बंधूंवर रवींद्र चव्हाण भडकले
अनेकजण असे आहेत जे निवडून आल्यानंतर साध फिरकतही नाहीत. अशा लोकांना आपण का निवडून देत आहोत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. परंतु, आमच्या समोर मोठ्या मोठ्या अडचणी आहेत, ज्या गेली तीन वर्षांपासून सुटलेल्या नाहीत. ते सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. दरम्यान, जर जनतेने निवडून दिलं तर लोकांसाठी अनेक काम ऑनलाईल करण्याचा प्रयत्न आहे. रस्ते स्वच्छता, बेरोजगारी या प्रश्नांवर लक्ष आहे.
यावेळी भाजपने प्रभाग रचना ही भाजपने मुद्दाम त्यांना सोईचा केलेला आहे. त्यांनी तसं केलं असलं तरी आम्ही असं होऊ देणार नाहीत असंही ते म्हणाले. लोकांसाठी आम्ही काम करतो आणि मी लोकांना भेटणारही आहे. त्यामुळे हे लोक कितीही प्रयत्न केला तरी मी लढणार आहे. तसंच, काँग्रेसने काय केलं असा प्रश्न विचारला जातो पण सर्व काँग्रेसनेच केलं. अनेक योजना आहेत ज्याचा फायदा आजही लोकांना होतो. हे लोक फक्त योजनांची नाव बदलतात त्यापलीकडं काही नाही असंही ते म्हणाले.
आज पुण्याची ओळख बदललेली आहे. पुण्याची सांस्कृतीक राजधानी अशी ओळख होती. ती आता कोयता गँग, खंडणीखोरी, गुन्हेगारीच्या टोळ्या अशा वातावरणात पुणे शहर आहे. परंतु, या मुलांच्या हातात ही कोयता, कट्टा बंदूक कोण देतं हाच खरा प्रश्न आहे असंही ते म्हणाले. तसंच, शिवाजी महाराजांच्या काळात सर्व जातीधर्म एक होत्या त्या आता कशा विभागल्या. आपण सर्व भारतीय आहोत बाकी नाही असंही ते म्हणाले.
