Pune News : तरुणीवरील हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाला आली जाग, पुण्यात दामिनी पथके

Pune News : तरुणीवरील हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाला आली जाग, पुण्यात दामिनी पथके

पुण्यात गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. पुणे पोलिसांकडून नव्या 25 दामिनी पथके निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता पुण्यात घडणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर पोलिसांचाा वॉच राहणार आहे.

Mahesh Manjrekarनी आकाशसाठी स्वतः बनवलं जेवण; लेकाच्या हॉटेलात रंगला बेत, Video Viral 

नूकतीच पुण्यातील सदाशिव पेठेत एका विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दामिनी पथकांसह आणखी 100 बीट मार्शल पुणे शहरात गस्त घालणार आहेत. आधी पुण्यात 100 बीट मार्शल होते आता एकूण 200 बीट मार्शल शहरात गस्त घालणार आहेत.

Bigg Boss OTT 2: भाईजानच्या शोमधून अवघ्या १० दिवसात आलियाला दाखवला बाहेरचा रस्ता

त्याचबरोबत पुण्यातल्या सर्वच पोलिस चौक्या आता 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसणार आहे. दरम्यान, दामिनी पथके, बीट मार्शलसह, समुपदेशनाचे कार्यक्रमही पोलिसांकडून हाती घेण्यात येणार आहेत.

जिल्हा विभाजनावर न बोलणे चांगले ! श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीची हवा थोरातांनीच काढली !

दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वीच एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या करण्यात आली. राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पुण्यातल्या सदाशिव पेठेत एका विद्यार्थीनीवर युवकाकडून हल्ला करण्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच विवाहित तरुणीनेच प्रियकर तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

दर्शना पवारची हत्या करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यानेच हत्या केल्याची कबुलीही दिलीय. तर दुसरकीडे नूकत्याच सदाशिव पेठेत घडलेल्या घटनेतील आरोपीलाही पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली असून मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर अशा घटना घडू नये, म्हणून पोलिसांकडूनही सतर्कता बाळगण्यात येत असून शहरात पोलिसांनी आपली गस्त वाढवली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube