प्रेमसंबंधातून वकिल आणि पत्नीने थंड डोक्याने पूनमला संपविले; पण लेडीज टेलर आणि सासऱ्याच्या संशयाने बिंग फुटले !

pune-दिनेश मुन यांची पत्नी पूनम ही अॅड. संजय सावंत यांच्या चंदनगरमधील येथील ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून नोकरीस होती.

  • Written By: Published:
Pune Crime

पुणे: पुण्यात प्रेमसंबंधातून वकील, त्याची पत्नी आणि मुलगी यांनी मिळून एका विवाहित महिलेचा क्रूरपणे खून केला. त्यानतंर महिलेचा मृतदेह फेकून देण्यासाठी एका पोत्यात भरून कार्यालयात ठेवला होता. खून झालेला महिलेचा पती आणि सासरे या दोघांना वकिलाच्या कार्यालयात जावून चौकशी केल्यानंतर त्यानाच कार्यालयात रक्त आढळून आले, तसेच एका पोत्यात मृतदेह आढळून आला आहे. पूनम दिनेश मून असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. खुनाच्या गुन्ह्यात अॅड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती, मुलगी या तिघांना अटक करण्यात आली आहे.

दिनेश मुन यांची पत्नी पूनम ही अॅड. संजय सावंत यांच्या चंदनगरमधील येथील ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून नोकरीस होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पत्नी पूनम आणि अॅड. सावंत यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय अॅड. सावंत यांच्या पत्नीला आला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला होता. सावंत यांनी पत्नीला समजावून सांगितल्यानंतर वाद मिटला होता. पूनम मून ही दुसरीकडे जॉब शोधत होती. एका ठिकाणी मुलाखतीला जाण्यासाठी तिने 16 एप्रिलला पतीकडे विचारणा केली होती. परंतु दुसरीकडचे काम झेपत नसल्याचे दिनेश मून यांनी पत्नी पूनमला हिचा मुलाखतीला जावू नको, असे सांगून फोन बंद केला होता. त्यानंतर दुपारी अॅड. संजय सावंत यांनी दिनेश मून यांना व्हॉटसअॅप मेसेज पाठविला. पूनम मॅडम कुठे आहेत, त्यांचे काही अपडेट नाही, असे सांगितले. त्यामुळे पत्नीला फोन केला असता तिचा मोबाइलवर फोन केला असता फोन उचलला नव्हती. त्यानंतर आय विल कॉल यू बॅक लेटर असा मेजेस आला.

त्यानंतर दिनेश मून हे नोकरीवरून रात्री घरी आले. त्यानंतर पत्नीला फोन केल्यानंतर फोन नॉट रिचेबल आला. त्यामुळे अॅड. सावंत यांना कळवून दिनेश मून हे सावंत यांच्या ऑफिसमध्ये गेले. परंतु ऑफिस बंद होते. त्यामुळे शेजारच्या टेलर दुकानामध्ये असलेल्या एका महिलेस दिनेश यांनी पत्नीबाबत विचारणा केली. त्यांनी पूनमला ऑफिसला आल्याचे पाहिले नसल्याचे सांगितले आहे. परंतु सावंत, वकिलांची पत्नी व मुलगी दुपारी ऑफिस आले होते, असे सांगितले. त्यामुळे सावंत यांना कॉल करून विचारणा केली. त्यांनी वाघेश्वर मंदिरामध्ये जाऊन पाहणी करण्यास सांगितले. परंतु तिकडे पूनम ही मिळून आली नाही. त्यानंतर सावंत यांना फोन करून लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनला पतीने तक्रार नोंदविली होती.

सासरे, पती सावंतच्या कार्यालयात गेले अन् बिंग फुटले
शुक्रवारी सकाळी पूनमचे सासरे हे सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाच्या शटरला लॉक नव्हते. त्यामुळे पूनमच्या पतीने सावंत यांना फोन करून त्यांच्या परवानगी दरवाजा उघडून पाहिला. त्यावेळी आतमध्ये कोणी नव्हते. आतील ऑफिसमध्ये टेबलवर पूनम हिची बॅग होती. तेथे बाजूला एका पोत्यामध्ये काही तरी ठेवलेले होते. तसेच खाली फरशीवर, भिंतीवर रक्ताचे डाग दिसल्याने पूनम हिची बॉडी पोत्यात असल्याचा संशय दिनेश मून यांना आला. त्यानंतर चंदनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थित पोते उघडल्यावर त्यात पूनम हिचा मृतदेह आढळून आले. एक लाकडी बॅट होती. पूनम हिचे पाय दोरीने बांधलेले होते. तसेच तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जखमा होत्या. त्यामुळे संजय सावंत, त्यांची पत्नी संजय सावंत आणि त्यांची मुलगी स्वरांजली यांनी कट रचून पत्नीची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

follow us