अजितदादांच्या विरोधात कोण उभं राहणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

अजितदादांच्या विरोधात कोण उभं राहणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar On Ajit Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात (baramati Assembly Constituency)फक्त अजितदादाच (Ajit Pawar) जिंकू शकतात. बाकी कोणीही जिंकू शकत नाही. राहिला प्रश्न लोकसभेचा तर त्यासाठी बारामतीची जनता हुषार आहे, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी दिला आहे. रोहित पवार यांनी पुण्यामध्ये (Pune)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्याशिवाय कोणीही जिंकू शकत नाही. त्यामुळे बारामती मतदारसंघात अजितदादांविरोधात आपल्याकडून कोणीही उमेदवार दिला जाणार नसल्याची भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली. लोकसभेच्या जागेचा प्रश्न असेल तर त्यासाठी बारामतीची जनता हुषार आहे असेही पवार म्हणाले.(Pune rohit pawar criticise on ajit pawar baramati Assembly Constituency supriya sule parth pawar bjp ncp)

…म्हणून ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदेंचं विमान जळगावला वळवले; रस्ते मार्गाने धुळ्याला रवाना

त्याचवेळी पत्रकारांनी विचारले की, पार्थ पवार हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीची लोकसभा लढवतील का? त्यावर रोहित पवार यांनी असे होणार नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर पवार म्हणाले की, अजितदादा ते होऊ देणार नाहीत. तसेच पार्थसुद्धा ती भूमिका घेणार नाही एवढा मला विश्वास आहे, असे पवार म्हणाले.

Udhav Thackeray : मर्दाची औलाद असाल तर तुम्ही.., उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट मैदानातच बोलवलं

रोहित पवार म्हणाले की, भाजपाने कितीही ताकद लावली, कितीही भाजपाने घरातला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला तरीही मला विश्वास आहे. कुटुंबाचा विषय आहे म्हणून बोलतोय, भूमिका म्हणून बोलत नाही. दादा त्याचा विरोध नक्की करतील. आजच्या तारखेला आपल्याकडे किती आमदार आहेत असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर पवार म्हणाले की, आम्ही कार्यकर्ते मोजतोय, पदाधिकारी मोजतोय.

आमदार आपल्याबाजूने राहणे गरजेचे असले तरी आमदार काय काय भूमिका घेतात, हे पवारसाहेबांच्या कानावर आहे ना. जे आमदार दुसऱ्या गटात गेले आहेत, ते पवारसाहेबांशी चर्चा करुनच गेले आहेत. काही आमदारांना कशा-कशा अडचणी आहेत, हे सांगितल्यानंतर कदाचित काही ठराविक लोकांच्या बाबतीत पवारसाहेबांनीच भूमिका घेतली असावी की, ठिक आहे एवढी अडचण असेल तर तात्पुरता विचार करावा. तात्पुरता विचार जेव्हा केला जातो, आणि खऱ्या अर्थाने निवडणुका जेव्हा समोर येतं, तेव्हा ठराविक लोकं जी आहेत, जी चांगल्या विचारांची आहेत, त्यांना खरंच अडचण होती, व्यक्तीगत नाही, दुसरी कुठलीही, त्यावेळी पवारसाहेब वेगळी भूमिका घेतील.

जे लोकं सुरुवातीपासून आणि मुद्दामहून कुठंतरी पवारसाहेबांच्या विरोधात विचारसरणीच्या विरोधात बोलत आहेत जे आमदार आहेत, त्यांना कदाचित पवारसाहेब येत्या काळात उभं करणार नाहीत. पण जे लोकं योग्य अशी भूमिका घेत आहेत किंवा भूमिकाच घेत नाहीत, मी मंत्र्यांच्या बद्दल बोलत नाही, आमदारांबद्दल बोलत आहे.

त्यांच्याबद्दल नक्कीच योग्य अशी भूमिका घेतील, असं असलं तरी जिथं कुठं सभा होत आहेत, त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना आमिषं दाखवूनही गेले नाहीत ते पवारसाहेबांबरोबर राहिले आहेत, त्यांचासुद्धा येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये किंवा पदांच्या बाबतीत केला जाईल, असा विश्वास माझ्यासारख्याला आहे असेही यावेळी आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube