Ramesh Bagve : ‘मतां’साठी भाजपचे घाणेरडे राजकारण!

Ramesh Bagve : ‘मतां’साठी भाजपचे घाणेरडे राजकारण!

पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) खूप आजारी असताना ही त्यांना मतांच्या राजकारणासाठी भाजपने (BJP) प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला ही संतापजनक बाब आहे. भाजपचे हे राजकारण अत्यंत घाणेरडे असून जनता भाजपले धडा शिकवल्याशिवाय राहार नाही, अशी सडकून टीका माजी राज्यमंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांनी भाजपवर केली.

कसबा पेठ मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी प्रभागाप्रमाणे कोपरा सभा घेण्यात आल्या. गुरुवार पेठ पान घंटी चौक यथे झालेल्या कोपरा सभेत आमदार संग्राम थोपटे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, सप्रभारी हाजी दादु सेठ खान, महाराष्ट्र प्रदेश सचिव समनव्यक डॉ. नदीम खान यांचासह महाविकास आघडीचे व मित्र पक्ष्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

कॉंग्रेस पक्षाने जनतेच्या हितासाठी ज्या योजना आणल्या. त्याच योजनांची नावे बदलून हे सरकार काम करित आहे, असे नदीम खान म्हटले, तर निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असून कट्टर शिवसैनिक आता पेटून उठला आहे. त्यामुळे अधिका अधिक मतदान करून भाजपच्या विरोधात मतदान करणार असल्याचे शिवसेनेचे संदीप गायकवाड यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की, पुणे महानगरपालिकेची अनेक कामे झाली नाहीत. तरी खोटी बिले तयार करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube