केतन अग्रवाल हत्याकांडावरील वक्तव्य भोवलं; खिल्ली उडवणाऱ्या महिला डेंटिस्टचं 5 वर्षांसाठी निलंबन
Ketan Agrawal murder case female dentist suspended महिला डेंटिस्टने केतन अग्रवालची खिल्ली उडवल्याने तिचं 5 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
Remarks on Ketan Agrawal murder case female dentist suspended for 5 years : व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठा आणि धक्कादायक खुलासा करत केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. सिया आणि चेतनला अटक झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणात सखोल तपास करण्यात येत आहे. मात्र यामध्ये एका महिला डेंटिस्टने या प्रकरणाचे खिल्ली उडवल्याने तिचं थेट 5 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
डॉ. मुस्कान सोनी या AIDSA मध्य प्रदेशच्या खजिनदार (ट्रेझरर) पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या सोशल मीडियावरील कथित पोस्टला संघटनेने अत्यंत आक्षेपार्ह, असंवेदनशील आणि संस्थेच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात असल्याचे मानले आहे. त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
स्पायडर-मॅन : ब्रँड न्यु डे हा ‘ईपिक’ स्वरूपात सादर होणारा पहिला हॉलिवूड चित्रपट
संघटनेने जारी केलेल्या आदेशानुसार, पुढील पाच वर्षे डॉ. मुस्कान सोनी यांना AIDSAच्या कोणत्याही पदावर राहता येणार नाही. तसेच त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले असून, त्या कोणत्याही अधिकृत उपक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत किंवा संघटनेच्या निवडणुका लढवू शकणार नाहीत.
Muskan Soni, a dentist in Madhya Pradesh, is in the centre of a controversy after she mocked Pune businessman Ketan Agarwal, who was allegedly killed by his fiance. Soni’s All India Dental Students and Surgeons Association (AIDSA) membership has been suspended for five years.… https://t.co/8FOFSHmNQl pic.twitter.com/C0lP9rOhRT
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) July 1, 2026
अहिर म्हणजे निर्भीड; योग्य वेळी… सचिन अहिर उपसभापती होताच CM फडणवीसांनी पाठ थोपटली
दरम्यान, केतन अग्रवाल आणि सिया यांचा फेब्रुवारी 2026 मध्ये साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर दोघेही आनंदी आणि सुखी नात्यात असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, तपास यंत्रणांच्या आरोपांनुसार, सियाने कथितपणे तिचा मित्र चेतन याच्या मदतीने केतनला लोहागड किल्ल्याजवळील दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेपूर्वीही अशाच प्रकारचा प्रयत्न झाल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, विविध दावे आणि पुराव्यांची तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे.