Union Budget 2023 : अर्थसंकल्पात महिलांच्या.., रुपाली चाकणकरांनी दिली प्रतिक्रिया

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात महिलांच्या.., रुपाली चाकणकरांनी दिली प्रतिक्रिया

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला आहे. या अर्थसंकल्पावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील अर्थसंकल्पावरुन भाजपवर टीकेची तोफ डागलीय.

चाकणकर म्हणाल्या, भाजपने आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अर्थसंकल्पात फक्त मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्याचं सांगण्यत येत आहे. महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा करण्यात आलीय.

मात्र, यामध्ये किती महिला गुंतवणूक करु शकतात? दोन लाखांची गुंतवणूक केल्यास वार्षिक 7. 50 टक्के व्याज महिलांना देण्यात येणार आहे. वर्षाला दोन लाख म्हणजे दर महिन्याला साधारण 17 हजार होतात. एवढी गुंतवणूक करणाऱ्या महिला राज्यात किती आहेत? याचा केंद्र सरकारने विचार केला आहे का? असा खोचक सवाल चाकणरांनी केला आहे.

तसेच पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या, फक्त लोकप्रिय, मोठ्या घोषणांना अर्थ नाही. दीनदयाल अंत्योदय योजनेत ग्रामीण भागात 81 लाख बचत गट केल्याचे सांगितले आहे, खरे पण या महिलांना ठोस अर्थसहाय्य देण्याबाबत काही घोषणा झालेली नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

अर्थसंकल्पात फक्त मोठ्या घोषणा आहेत. बुधवारी सकाळीच सीएनजी स्वस्त केला आहे. हे सगळ आगामी निवडणुकांसाठीच आहे. मध्यम वर्गाला, कर भरणाऱ्या नोकरदार वर्गाला डोळयासमोर ठेवून कर रचनेत मध्ये बदल केले गेले आहेत पण त्यात जुने आणि नवीन असा शब्दांचा गोंधळ घालत फक्त घोषणा केल्या आहेत.

दरम्यान, सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये बचत गट आणि सक्षमीकरण, महिला सुरक्षेसाठी उल्लेख नाही. या अर्थसंकल्पात रोजगाराचाही काहीच उल्लेख नसून याआधी सरकारकडून दोन कोटी रोजगाराच्या घोषणा देखील देण्यात आल्या होत्या? त्याचं काय झालं, असा सवालही त्यांनी केलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube