पूरपरिस्थितीत अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maharashtra Rain आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

Maharashtra Rain

Maharashtra Rain Safe rescue of pilgrims stranded in floodwaters; administration’s rescue operations underway on war footing : राज्यात सर्वदूर पावसाने थैमान घातले असून, ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. त्यात आता इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

लोणावळा परिसरात कलम 163 लागू; धबधबे, किल्ले व पर्यटनस्थळी 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, तसेच (एनडीआरएफ) आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली.

दरडी, पूर आणि वादळी वाऱ्यांच्या संकटात महाराष्ट्र; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय, बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील १५० गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीला महापूर; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने नदीकाठचा परिसर सील केला

प्रशासनामार्फत बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक व भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

follow us