Sanjay Raut : भारतीय जनता पार्टीच्या अंताची सुरुवात… जनता धडा शिकवेल!

Sanjay Raut : भारतीय जनता पार्टीच्या अंताची सुरुवात… जनता धडा शिकवेल!

पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ४० बाजारु आमदारांना घेऊन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray) यांची शिवसेना संपवत आहे. रामाचा धनुष्यबाण रावणाला कसा दिला जातो. हे सर्व कौरवांच्या मदतीने भाजप करत आहे. कौरवांची संख्या जास्त असली तरी विजय हा पांडवांचा होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली मान, प्रतिष्ठा गमावली आहे. यापुढे निवडणूक आयोगावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, अशी कठोर शब्दात भाजप आणि निवडणूक आयोगावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) टीका केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर संजय राऊत म्हणाले की, भाजपने या देशात अत्यंत घाणेरडे, खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु केले आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या मदतीने शिवसेनेला संपवण्याचे काम भाजप करत आहे. मात्र, या राज्यातला मतदार ठरवणार आहे की कोण खरी शिवसेना आहे. तुम्ही एकदा निवडणुकांना सामोरे जाऊन बघा मग तुम्हाला खरं काय आहे ते कळेल. मात्र, मी आज तुम्हाला लिहून देतो की भाजपच्या अंताची सुरुवात झाली आहे, हे नक्की असे देखील राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि भाजप पैशाच्या जोरावर लोकशाही पायदळी तुडवत आहे. मात्र, या राज्यातली, देशातली जनता कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमधून जनता भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना घरी पाठवल्याशिवाय गप्प राहणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube