अडचणीत काँग्रेसचा कार्यकर्ता सोबत आहे; पदग्रहण सोहळा काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं प्रतिपादन

पदग्रहण करताच पक्षातील काँग्रेस पक्षाचा विचार आणि वारसा जपणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

News Photo   2026 06 07T162744.871

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे (Congress) नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचा पदग्रहण सोहळा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आणि मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पिंपरी येथील हॉटेल मध्ये संपन्न झाला.

काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते काँग्रेसचा ध्वज नवनिर्वाचित शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि तो स्वीकारात त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला.

पदग्रहण करताच पक्षातील काँग्रेस पक्षाचा विचार आणि वारसा जपणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. काँग्रेस पक्षाचा पिंपरी-चिंचवड शहराचा लोगो, एस आय आर मतदार यादी पुनर्परीक्षण अभियानाच्या माहिती मदत क्रमांकाचे उद्घाटन, पिंपरी-चिंचवड काँग्रेस वेबसाईटचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बाळासाहेब थोरातांना धक्का…काँग्रेस कार्यकर्त्यांचा खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

यावेळी बनसोडे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या बाजूने नागरिकांचा कौल स्पष्ट जाणवतो आहे या शहराची जडणघडण काँग्रेस कडूनच झाली मात्र 1999 नंतर वरिष्ठ नेते शहरात येत नाहीत पवारांशी थेट सामना केला जात नाही, या भावनेने कार्यकर्ते खचत गेले आणि काँग्रेस पक्ष काही प्रमाणात कमकुवत झाला.

सतेज पाटील म्हणाले, पूर्वीच्या काळात स्वर्गीय रामकृष्ण मोरे स्वर्गीय अनंतराव थोपटे आणि राज्यातील इतरही नेत्यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा पाया मजबूत केला मात्र पुढील काळात आघाडीमुळे दुर्दैवाने एकमेकांच्या ठिकाणी लक्ष न देण्याचे ठरले त्यामुळे पक्ष कमी झाला पण जरी अडचण असली तरी रात्र नंतर पुन्हा सूर्य उगवतो त्यानुसार आता तयारी करा दहावीस वर्षांपूर्वीचा काँग्रेस पक्ष पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा.

संजय आवटे म्हणाले, आता काँग्रेसने सिव्हिल सोसायटीला सोबत घेत काम करणे महत्त्वाचे आहे, बनसोडे सारख्या युवकाला संधी मिळणे आणि त्यांच्या पदग्रहणाला बंटी पाटील सारख्या नेत्यांनी येणे ही बाब विशेष आहे.

यावेळी मानव कांबळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, हाजी जाकीर शेख, दाहर मुजावर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, माजी महापौर कवीचं भाट, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दही तुले, माजी नगरसेवक अत्तर भाई चौधरी, काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. जितेंद्र जैन, प्रा. बी बी शिंदे, गौतम आरकडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश खंदारे, स्वप्निल बनसोडे, महादेव वाळुंजकर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे, प्रवीण कदम, वैभव जाधव, छावा संघटनेचे रावसाहेब गंगाधरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यादरम्यान, 20 सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने मुंबई येथील निवृत्त न्यायाधीश बाळासाहेब पाटील, सदाशिव तळेकर, वंचितच्या शिल्पा गायकवाड, प्रवीण कांबळे, जावेद इनामदार, महेंद्र सरोदे, अतुल शिंगाडे, मनोज गिल, बाबा बनसोडे, कमलेश जैन, गोरख खळगे यांचा समावेश होता. राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अनंतरावजी थोपटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

follow us