भाजप- शिवसेना युतीचा लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर?

भाजप- शिवसेना युतीचा लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर?

Shivsena and BJP :  भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जाहिरातीवरुन वादावादी सुरु होती. त्यानंतर आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्याने या वादावर पडदा पडला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून येते आहे. भाजपने श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण- डोंबिवली मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. तसेच धाराशिव व छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुनदेखील वाद सुरु आहे. यातच भाजप शिवसेना युतीचा लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर झाला आहे.

मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 2024  साली शिवसेना व भाजपचा लोकसभेचा उमेदवार मीच असणार असे वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट आपली उमेदवारी जाहीर केली आहे. बारणे म्हणाले की, 2024 साली शिवसेना व भाजपचा उमेदवार मीच असणार आहे. त्याबाबत माझे संबंधित नेत्यांशी बोलणे झाले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीला अद्याप 10 महिने बाकी आहे, त्यामुळे आत्ताच यावर अधिक बोलणार नाही.

काँग्रेस-भाजप-काँग्रेस-भाजप… आशिष देशमुखांचे वर्तुळ पूर्ण! आता तरी स्थिरावणार का?

त्यामुळे बारणे यांनी थेट आपली उमेदवारीच जाहीर केली आहे. एकीकडे शिवसेनेच्या लोकसभेच्या जागांवर भाजपचे नेते दावा करत असताना मात्र, बारणे यांनी आपली उमेदवारी जाहीर करत संबंधित नेत्यांशी बोलणे झाले आहे असे सांगितले. त्यामुळे भाजपचा देखील बारणे यांचा उमेदवारीला हिरवा कंदिल मिळाल्याचे दिसते आहे.

‘एक दिल टुकडे हजार, कोई कहाँ गिरा’.. बावनकुळेंनी शायराना अंदाजात केलं महाविकासआघाडीचं भाकीत

दरम्यान, श्रीरंग बारणे यांनी 2019 साली मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते व सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता. पवार घराण्यातील पार्थ पवार पहिले असे व्यक्ती आहेत की ज्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पार्थ पावर बारणेंच्या विरोधात पुन्हा शड्डू ठोकणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube