सनीज वर्ल्डची ‘हिरवाई’.. हीच धर्मेंद्रजींना आदरांजली; निम्हण कुटुंबाकडून आठवणींना उजाळा

गेली कित्येक दशके भारतीय सिनेमा विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्रजींना एक महान कलाकार म्हणून सगळेजण ओळखतात.

  • Written By: Published:
सनीज वर्ल्डची 'हिरवाई'.. हीच धर्मेंद्रजींना आदरांजली; निम्हण कुटुंबाकडून आठवणींना उजाळा

Sunny Nimhan’s Sunny’s World Homage To Bollywood Actor Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज (दि.24) वयाच्या 89 व्या निधन झाले. त्यानंतर त्यांना विविध स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात असून, युवक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण (Sunny Nimhan) यांच्या सनीज वर्ल्डने धर्मेंद्र यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, पवारांना आठवला शोले सिनेमातील पाण्याच्या टाकीवरील प्रसंग

गेली कित्येक दशके भारतीय सिनेमा विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्रजींना (Dharmendra) एक महान कलाकार म्हणून सगळेजण ओळखतात. परंतु काहीच लोकांना कदाचित माहित असेल की, ते एक सच्चे निसर्गप्रेमी होते. त्यातही भारतीय पारंपारिक आणि प्रादेशिक प्रजातीच्या वृक्षांवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या फार्महाऊसवर त्यांनी अनेक वृक्षांची लागवड केली होती. ते स्वतः बागकाम करत आणि भेटायला आलेल्या प्रियजनांना आपल्या बागेतील ऑरगॅनिक भाजीपाला आणि फळे भेट म्हणून देत.

Dharmendra : गाड्यांचे शौकीन धर्मेंद्रंनी विकत घेतली होती सर्वसामान्यांच्या स्वप्नातली पहिली कार

काही वर्षांपूर्वी दिवंगत धर्मेंद्रजींनी सनीज वर्ल्डला भेट दिली होती. त्या भेटीत त्यांना सनीज वर्ल्डचा परिसर खूप आवडला होता. फेरफटका मारताना त्यांनी आबांना आवर्जून सांगितले की, तुम्ही या परिसरात प्रादेशिक महाराष्ट्रीयन आणि भारतीय पारंपारिक प्रजातींचे वृक्ष लावा. आबा आणि आमच्या सगळ्या टीमने ती सूचना लक्षात घेत सनीज वर्ल्ड येथे प्रादेशिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली.

धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नव्हते… ते एक युग होतं, ती होती एक भावना…

आज ती वृक्षसंपदा बहरली आहे. सनीज वर्ल्डच्या ऐश्वर्यात भर घालणारी ही शाश्वत आणि सदाहरित संपदा म्हणजेच दिवंगत धर्मेंद्रजींना खरी आदरांजली ठरेल. ही हिरवाई कायमच त्यांच्या आठवणी जागृत ठेवेल आणि त्यांच्या आशीर्वादाची सावली आमच्यावर अखंड ठेवेल असा विश्वास आहे. आमच्या निम्हण कुटुंबियांच्या आणि सनीज वर्ल्ड परिवारातर्फे धर्मेंद्रजींना भावपूर्ण श्रद्धांजली! सनीज वर्ल्डची ‘हिरवाई’.. हीच धर्मेंद्रजींना आदरांजली!

follow us