तमिळनाडूमध्ये विजयची हवी; पण लॉटरी किंगचाही जलवा, चक्क कुटुंबातील तिघे वेगवेळ्या पक्षाकडून आमदार

Tamil nadu Assembly Election-लॉटरी किंग सॅंटियायो मार्टिन यांच्या कुटुंबातील तिघे विधानसभेत गेले आहेत. दोघांनी तमिळनाडू, तर एक जणाने पुद्दुचेरी विधानसभेत एन्ट्री केलीय.

Tamilnadu Election 2026

Tamil nadu Assembly Election: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत (Tamil nadu Assembly Election) अभिनेता विजयच्या टीव्हीके (TVK) पक्षाने सर्वाधिक जागा मिळवत चमत्कार केलाय. अभिनेता विजयाच्या वादळात मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M k Stalin) यांचा पक्ष सत्तेतून गेलाय, शिवाय तेही पराभूत झाला. पण लॉटरी किंग सॅंटियायो मार्टिन (Santiago Martin) यांच्या कुटुंबातील तिघे विधानसभेत गेले आहेत. दोघांनी तमिळनाडू, तर एक जणाने पुद्दुचेरी विधानसभेत एन्ट्री केलीय. विशेष म्हणजे तिघेही वेगवेगळ्या पक्षातून निवडून आलेत.

तमिळनाडूमधील लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांचा लॉटरी व्यवसाय अनेक राज्यात पसरलेला आहे. या व्यतिरिक्त बांधकाम व्यवसायतही ते आहेत. त्यांची संपत्ती सहा हजार कोटींपेक्षा जास्त आहे. मार्टिन यांच्या पत्नी लीमरोज मार्टिन या लालगुडी मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांना एआयएडीएमकेने उमेदवारी दिली होती. त्या गेल्या दहा वर्षांपासून या पक्षाशी निगडीत आहेत. त्यांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे के. पी. कृष्णन यांचा 2739 मतांनी पराभव केलाय. हा मतदारसंघ वीस वर्षांहून अधिक डीएमकेचा बालेकिल्ला होता. 2006 पासून हा मतदारसंघ डीएमकेच्या ताब्यात होता. परंतु डीएमकेचे उमेदवार परिवल्लाल हे पाच हजारांहून अधिक मतांने हरले असून, ते तिसऱ्या स्थानी राहिले आहेत.

तामिळनाडूच्या राजकारणात नवीन स्टार पण अजूनही बहुमताच्या आकड्यापासून दुरुच; सत्तेसाठी मोठा निर्णय घेणार?


मार्टिनचा जावई टीव्हीकेचा सरचिटणीस आणि आमदार

मार्टिन यांचा जावई आधाव अर्जुन हाही राजकारणात आला आहे. तो विजयच्या तामिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचा सरचिटणीस आहे. टीव्हीकेने अर्जुन यांना विक्कीवाक्कम मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. अर्जुन हे 17 हजारांहून अधिक मतांनी विजयी झालेत. त्यांनी डीएमकेचे कार्तिक मोहन यांचा 17 हजार 302 मतांनी आणि एआयएडीएमकेचे विजयकुमार एसआर यांचा 47,107 मतांनी पराभव केलाय.


मतदारांनी काँग्रेसचे हिंदू उमेदवारही नाकारले; आसाम, केरळ अन् बंगालच्या निकालांनी उडवली झोप!


पुदुचेरीमध्येही मार्टिन्सचा मुलगा आमदार

लॉटरी किंग मार्टिन्स यांचा मुलगा जोस मार्टिन्स यांचा लच्छिया जननायका कत्ची’ (LJK) हा पक्ष आहे. या पक्षाने पुदुचेरीची निवडणूक लढवली होती. स्वतः जोस मार्टिन्स हे कामराजनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी काँग्रेसचे पी. के. देवदास आणि टीव्हीकेच्या सुमन यांचा दहा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

लॉटरी किंग यांचे सर्वच पक्षांशी सलोख्याशी संबंध आहेत. राजकीय पक्षाने देणगी देण्यात ते आघाडीवर असतात. त्याचा फायदा आता त्यांना निवडणुकीत झाल्याचे दिसून येत आहे.

follow us