मुख्यमंत्र्यांनी हात झटकला; आढळराव निघून गेले

  • Written By: Published:
मुख्यमंत्र्यांनी हात झटकला; आढळराव निघून गेले

पुणे : पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) पत्रकार परिषद सुरू असतांना पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हाताने बाजूने केले. त्यानंतर काही वेळातच शिवाजीराव आढळराव पाटील (ShivajiRao AdhalRao Patil) यांनी पत्रकार परिषेदतून काढता पाय घेतला. त्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा आहे.

भाजपने कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये मोठी अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात तिकीट द्यावं, अशी मागणी होत असताना भाजपने मात्र हेमंत रासने यांना गड राखण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, आता रासने यांच्या उमेदवारी नंतर कसब्यात भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ब्राम्हण समाज नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=1ZTETdWcueg

यावर बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, नाही. मला ब्राम्हण समाजात नाराजी आहे, असं दिसलं नाही. रासने यांच्यासाठी सगळा ब्राम्हण समाज करतोय. मात्र, विरोधी पक्षांकडून ब्राम्हण समाज नाराज असल्याचं सांगितले जाते. सध्या सेना-भाजप युतीचे उमेदवार रासने यांना मतदारांचा जो प्रतिसाद मिळतो, तो पाहता, रासने हेच निवडूण येतील आणि तेच या मतदार संघाचा कायापालट करतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी कसबा मतदारसंघात भाजपाकडून कोणताही नेता आला तरी रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे असं म्हटलं होतं. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, निवडणुका आल्या की, प्रत्येकजण आपापली बाजू मांडत असतो. तसंच त्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या, पण मतदार शहाणा असतो. मतदार ठरवत असतात की, कुणाला विजयी करायचं अन् कुणाला पाडायचं. आम्ही ज्या पध्दतीने कामे करतो, ते पाहता, मतदार रासने यांनाच निवडूण देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेच शिवसेनेचे बॉस, मुख्यनेतेपदी निवड

दरम्यान, पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर बोलत असतांना, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी आढळराव पाटलांना हाताने बाजूला केले. हे सगळं प्रसारमाध्यमांच्या समोर झाल्यानं आढळराव नाराज झाले. त्यामुळे ते कुणाला काहीही न बोलता पत्रकार परिषदेतून बाहेर पडले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube