यंदाचा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा, युवाउद्योजक पुनीत बालन यांची प्रतिक्रिया

रोजगार आणि सामाजिक विकास यांचा समतोल यामध्ये राखल्याचं दिसत आहे. यावर युवा उद्योजक पुनीत बालण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 02 01T170948.415

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे. शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्यांवर लक्ष केंद्रित करतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उद्योग, रोजगार आणि सामाजिक विकास यांचा समतोल यामध्ये राखल्याचं दिसत आहे. यावर युवा उद्योजक पुनीत बालण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा, उद्योग, रोजगार आणि सामाजिक विकास यांचा समतोल साधणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, एआय, बायोफार्मा, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग आणि डेटा सेंटर्ससाठी करण्यात आलेल्या मोठ्या तरतुदी भारताला जागतिक उत्पादन व तंत्रज्ञान केंद्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरतील.

उच्च शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृहे; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

ग्रामीण युवक, महिला, लघु उद्योग, मत्स्य व्यवसाय आणि शेतीपूरक उद्योगांसाठीच्या योजनांमुळे समावेशक विकासाला गती मिळेल. खेलो इंडीया सारखे मिशन सारख्या उपक्रमांमुळे खेळाला चालना देणार ठरेल. महाराष्ट्रासाठी विशेषतः पायाभूत सुविधा, औद्योगिक गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प लाभदायक ठरणार आहे. पुणे–मुंबई हाय-स्पीड रेल कॉरिडॉर आणि पुणे–हैदराबाद रेल कॉरिडॉरमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक, आयटी आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल.

पुणे शहरातील स्टार्टअप, ऑटोमोबाईल, आयटी आणि संशोधन क्षेत्रासाठी एआय हब, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि औद्योगिक कॉरिडॉर योजनांचा थेट फायदा होईल. एकूणच हा अर्थसंकल्प भारत देशासह महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारा आणि पुण्याला जागतिक शहर म्हणून पुढे नेणारा ठरेल.

Tags

follow us