रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द; भारतात पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार?
Donald Trump -रशिया हा जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेल निर्यातदारांपैकी एक आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
Donald Trump Scraps Russian Oil Waiver: भारतासमोर एक मोठे ऊर्जासंकट उभं राहिलं आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस महागला आहे. इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदीसाठी (Russian Oil) सूट दिली होती. आता ही सूट मिळणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता रशियाकडून आपल्याला पेट्रोल (Petrol-Disel), डिझेल मिळणार नाही. त्यामुळे देशात पुन्हा एकदा इंधनाचे दर भडकण्याची शक्यता आहे.
प्रेयसी असताना दुसऱ्या मुलीसोबत लग्न, हळदीच्या कार्यक्रमात ‘तीची’ एन्ट्री अन्…
इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुझ ( Strait of Hormuz) ही सामुद्रधुनी ही बंद केली होती. त्यामुळे अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची सवलत दिली होती. रशिया हा जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेल निर्यातदारांपैकी एक आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपियन यूनियन देशाने रशिया-युक्रेन युद्धावेळी रशियन तेलावर कडक निर्बंध लादले होते. पण मार्च 2026 मध्ये इराण संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढल्यानंतर जागतिक तेल संकट अधिक तीव्र झाले होते. पुरवठा तुटवडा टाळण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने मार्च 2026 मध्ये विशेष सवलत दिली होती. ही सवलत आधीच टँकरवर लोड केलेल्या तेलाच्या कार्गोपुरती मर्यादित होती. ती 16 मेपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र काही युरोपीय देशांच्या विरोधानंतर ही सवलत आता संपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
चार टँकर मागितले तर दोनच मिळतात; पुण्यात इंधनपुरवठ्यावर निर्बंध, नागरिकांकडून घाईघाईत इंधन खरेदी
भारताने रशियन तेलाची आयात वाढवली होती…
पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटानंतर भारताने रशियन कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली होती. मार्च 2026 मध्ये भारताने दररोज सुमारे 4.5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले. त्यापैकी जवळपास 50 टक्के तेल रशियाकडून आले होते. याच काळात मध्यपूर्वेतून होणारा पुरवठा सुमारे 61 टक्क्यांनी घटला होता. एप्रिल 2026 मध्येही रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार राहिला. त्या महिन्यात भारताने दररोज सुमारे 1.57 दशलक्ष बॅरल रशियन तेल आयात केले, जे मार्चच्या तुलनेत जवळपास 20 टक्के कमी होते.
पेट्रोल-डिझेल पुन्हा महागण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वीच भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. तसेच CNGच्या दरातही वाढ झाली होती.आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेलेच राहिले, तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.