मी जे केलं त्याचा पश्चाताप नाही अभिमान, हनुमंत पवारांवर हल्ला केलेल्या दामगुडेची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी आपल्या मातृसंघटनेच्या संस्कारांना जागून गृहमंत्रिपदाच्या कर्तव्याकडं दुर्लक्ष केल्याची खंत आहे.
काल पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर स्वत:ला (Pune) हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणतात ते तुषार दामगुडे याने आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट असून कायदा व सुव्यवस्थेवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, मी जे केले ते योग्यच केलं, मला त्याचा पश्याताप नसून अभिमान आहे असं वक्तव्य यातील हल्ला करणाऱ्या दायगुडे याने केलं आहे.
हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात, त्या पार्श्वभूमीवर त्यांना ठोस प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात देशात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत, याचीही नोंद घ्यायला हवी. डिबेटदरम्यान हनुमंत पवार यांनी मला उद्देशून ‘तू पेशव्यांची पैदास आहेस, तू नाना फडणीस यांची पैदास आहेस, अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं, असा दावाही दामगुडेने केला आहे.
दामगुडे अन् हनुमंत पवार यांच्यातील वाद नेमका काय? हाणामारीमागे पडद्यावरची चर्चा; ठरली खरं कारण
माझ्याकडे कायदेशीर परवान्यासह बंदूक आहे. मी अनेक नक्षलवादी भागांमध्ये काम करतो, आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने बाळगणं मला गरजेचं वाटतं. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, पोलीस योग्य ते तपास करतील. पोलिसांनी मला माझं शस्त्र मागितलं मी ते त्यांना सोपवलं आहे, असंही तुषार दामगुडे म्हणाला आहे.
हनुमंत पवार आज काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी आपल्या मातृसंघटनेच्या संस्कारांना जागून गृहमंत्रिपदाच्या कर्तव्याकडं दुर्लक्ष केल्याची खंत आहे, असं काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आरोपींवर कठोर कारवाईची अपेक्षा ठेवत आहोत. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन नोटीस देत सोडून दिले, ही बाब गंभीर आहे. अशा प्रकरणांत कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी भूमिका हनुमंत पवार यांनी मांडली आहे.
