Video : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात आद (दि.2)रोजी पहाटे भीषण अपघात झाला. येथील बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात आद (दि.2)रोजी पहाटे भीषण (Accident) अपघात झाला. येथील बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर गाडीतील एक जण गंभीर जखमी आहे. अपघात नेमका कसा झाला याचा कोरेगाव पोलीस तपास करत आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात झालेल्या या भीषण अपघातात सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.
मृत ऋतिक भंडारी आणि यश भंडारी हे गाडीत पुढच्या सीटवर बसले होते, तर कुशवंत टेकवणी हा गंभीर जखमी झाला आहे. गाडीचा हँड ब्रेक ओढल्याने गाडीचं नियंत्रण सुटले आणि गाडी मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिल्लरला जाऊन धडकली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गाडीचा वेग अधिक असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. एम एच २४ डी टी ८२९२ गाडी काळ्या रंगाची गाडी असून गाडी भाड्याने घेतली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गणेश काळे हत्याकांडात सर्वात मोठी अपडेट; घटनेनंतर पोलिसांना आरोपींबाबत मोठ यश
पुणे पोलिसांकडून गाडी नेमकी कुठून आली, याचा शोध घेतला जातोय. रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू केलं आहे. थोड्याच वेळात फॉरेन्सिक टीम अपघातस्थळी दाखल होणार आहे. अपघातातील गाडीत अल्कोहोल किंवा अंमली पदार्थ होते का याची तपासणी करणार आहेत. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली आणि थेट मेट्रोच्या खांबावर आदळली.
या अपघातात तुकडे-तुकडे झाले. या अपघातात ऋतिक भंडारे आणि यश भंडारे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या फुटेजमधून कारचा वेग किती होता, याचा अंदाज येतो. भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात आद (दि.2)रोजी पहाटे भीषण अपघात झाला. येथील बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर गाडीतील एक जण गंभीर जखमी आहे.#Pune #Pineaccident pic.twitter.com/KMmYN8Xlor
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 2, 2025
