अवकाळी! ढगाळ वातावरण अन् पुण्यात पुन्हा भुरभुर

अवकाळी! ढगाळ वातावरण अन् पुण्यात पुन्हा भुरभुर

Unseasonal Rains Pune : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी सूर्यदर्शन देखील खूप कमी काळ झाले. यातच आज पुण्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी भुरभुर पाऊस झाला आहे. दरम्यान अचानक झालेल्या या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.

पुण्यासह राज्याच्या काही भागात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. आज पुन्हा पुण्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्यातील औंध, कोथरुड, बाणेर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द , जांभूळवाडी कोळेवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

अवकाळीचा फटका बळीराजाला
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीचा मोठा फटका बळीराजाला बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचाच फटका पुण्यातील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांसह शेतीमालाचं नुकसान होतं. पुण्यातही सामान्यांना या अवेळी पावसाचा फटका बसत आहे.

या भागाला पावसाने झोडपून काढले
अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे पुणे शहारतील सिंहगड रोड, बाणेर रोड, जेएम रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले आहे. पुणे शहरासह परिसरातदेखील पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी भुरभुर पाऊस होऊ लागला आहे.

मला ‘ईडी’ची नोटीसच नाही…जिल्हाधिकारी पांडेंचं स्पष्टीकरण

ढगाळ वातावरण…
मे महिना सुरु होऊन तब्बल आठ दिवस होऊन गेले आहे. कडाक्याचा उन्हाळा असलेल्या या महिन्यात सध्या राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे. सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे दमट वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळते आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube