Video : वडेट्टीवारांच्या मनात संशय कल्लोळ; म्हणाले, पवार साहेब पुरोगामी विचारधारेला हरताळ फासून….

vijay wadettiwar पवारांचे अनेक आमदार-खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या खळबळजनक दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.

  • Written By: Published:
Video : वडेट्टीवारांच्या मनात संशय कल्लोळ; म्हणाले, पवार साहेब पुरोगामी विचारधारेला हरताळ फासून....

Vijay Wadettiwar Attack On Sharad Pawar : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी महायुती ऐवजी पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. दादांच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, काका आणि पुतण्याच्या या युतीनंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या मनात संशय कल्लोळ माजला आहे. याच संशयाच्या कल्लोळातून वडेट्टीवारांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुण्यात गुन्हेगारांना तिकिटं दिल्याच्या प्रश्नावर शशिकांत शिंदेंकडून अजितदादांची पाठराखण

शरद पवार पुरोगामी विचारधारेला हरताळ फासून भाजपला मदत करतील

पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांचे आतापर्यंतचे राजकारण हे पुरोगामी विचारांचं राहिलं आहे. परंतु, पुण्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्याने पवारांच्या या भूमिकेला गालबोट लागल्याचे ते म्हणाले. एवढेच नव्हे तर, पवार साहेब पुरोगामी विचारधारेला हरताळ फासून भाजपला मदत करतील का? अशी देखील चर्चा असल्याचा खळबळजनक संशय वडेट्टीवार यांनी बोलताना  व्यक्त केला आहे. Vijay Wadettiwar Attack On Sharad Pawar

पवारांचे अनेक नेते दादांच्या संपर्कात

एकीकडे पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर वडेट्टीवारांनी शरद पवारांचे अनेक आमदार-खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या खळबळजनक दावादेखील केला आहे. पुण्यात जर तडजोड होत असेल तर, सगळ्याच ठिकाणी तडजोड होऊ शकेल, असे म्हणत पुण्यातील युती ही भविष्यातील राजकारणाची पहिली पायरी तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

पुण्यात राजकीय पक्ष गुंडांना पोसणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आंदेकर अन् मारणेंना उमेदवारी

पोलिसांच्या भरतीप्रमाणे भाजपात गुंडाची भरती

यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पोलिसांची भरती होते तशी भाजपने गुंडांची भरती राज्यभर आता सुरू केली पाहिजे. कोणत्या गुन्हेगारावर किती जास्त गुन्हे आहे असे निकष लावून भाजपने समिती स्थापन करून गुंडांची भरती केली पाहिजे. अजय सरकार सारख्या गुंडाला उमेदवारी देण्यावरून भाजपने लाज, लज्जा, शरम विकून खाल्ली आहे, अशा तीव्र शब्दात टीका केली आहे.

follow us