राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच; काकडे, जैनसह चार जणांची नावे चर्चेत

Vidhan parishad Election 2026- कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार होणार आहे.

  • Written By: Published:
Ncp Vidhan Parishad

Vidhan parishad Election 2026 : विधान परिषदेसाठी (Vidhan parishad Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असल्याने सर्व पक्षांमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार पक्षाच्या कोअर कमिटीची उद्या मुंबईमध्ये या निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीसाठी महत्वाची बैठक होणार आहे. पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार आहे.


एकनाथ शिंदेंचा पवार ठाकरेंना धक्का, लातूरमध्ये बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार यांची पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बघायला मिळत आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्वाची राहील असे सूत्रांकडून समजले आहे. पार्थ पवार यांना त्यांची स्वतःची विश्वासू टीम बनवण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढची तीन वर्षे तरी महत्वाची निवडणूक नाही. तीन वर्षांनंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी पक्षाचे संघटन आतापासूनच मजबूत करून निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळवून द्यायचं असेल तर, पार्थ पवार यांना त्यांची स्वतःची विश्वासू टीम लागेल. जुन्या नेत्यांबरोबरच नव्या दमाच्या शिलेदारांना संधी देऊन पक्षाच्या टीममध्ये विश्वासू सहकाऱ्यांना आणण्याची पार्थ पवारांना ही संधी ठरू शकते.

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, 2028 पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींना बंदी

इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार हे 30 एप्रिल रोजीच स्पष्ट होईल. परंतु, चर्चेत असलेल्या नावांवर विचार करता परिवार आणि पक्ष संघटना याच्याशी एकनिष्ठता असलेल्या व्यक्तीला संधी मिळू शकते. विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे विश्वासू सहकारी मानले जातात. याबरोबरच पक्षाचे नेतृत्व दिवंगत अजित पवार यांच्याबरोबरही विक्रम काकडे यांनी काम केले आहे आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील संजय काकडे माजी खासदार आहेत. सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. झिशान सिद्दीकी माजी आमदार आहेत आणि राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी आमदार असून प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या चर्चेत असलेल्या नावांपैकी उद्या होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

follow us