पुण्यातील व्यावसायिक गर्लफ्रेंडसोबत फॉरेन ट्रिपला निघाला, पत्नीला सांगितलं खोटं; फोन बंद झाला अन्

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशनची अडचण निर्माण झाल्यानंतर त्याने पत्नीला खोटी माहिती दिली आणि मोबाईल फोन बंद केला.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Pune Mumbai Police

मुंबई : घरात बायको असताना बाहेर लफडे करणाऱ्या व्यावसायिकाचे बिंग फुटले आहे. व्यवसायाच्या कामानिमित्त परदेशात जात असल्याचे पत्नीला सांगून प्रत्यक्षात गर्लफ्रेंडसोबत परदेशात जाण्याचा बेत एका पुण्यातील व्यावसायिकाच्या चांगलाच अंगलट आलाय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशनची अडचण निर्माण झाल्यानंतर त्याने पत्नीला खोटी माहिती दिली आणि मोबाईल फोन बंद केला. त्यामुळे पत्नी घाबरली आणि तिने पतीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर व्यावसायिकाचा खरा कारनामा समोर आल्यानंतर पत्नीच्या पाया खालची जमीनच सरकली. (Pune businessman leaves for a foreign trip with his girlfriend, lies to his wife; phone goes switched of)

माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा कासव, टीकाकारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खास शैलीत टोलेबाजी

पुण्यातील लॉन्ड्री व्यवसाय करणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीने आपल्या महिला मैत्रिणीसोबत कुआलालंपूरला जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, विमानतळावर इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्याच्या महिला मैत्रिणीच्या पासपोर्टबाबत अडचण निर्माण झाली. तिच्याकडे असलेला पासपोर्ट जुना होता आणि तो यापूर्वीच हरवल्याचे घोषित करण्यात आले होते. मैत्रिणीला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखल्यानंतर त्या व्यावसायिकाने परदेशातील प्रवास रद्द केला. विमानतळावरून निघण्यापूर्वी त्याने लँडलाइनवरून पत्नीला फोन केला.


मॉस्कोवर शेकडो ड्रोनने हल्ले; रशियाच्या संसदीय निवडणुकीच्या शेवटची दिवशी रक्तपात

इमिग्रेशनच्या समस्येमुळे त्याला मोबाईल फोन जमा करावा लागल्याचे त्याने पत्नीला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने व्हॉटसअप व्हिडिओ कॉलद्वारे पत्नीशी काही वेळ संवाद साधला आणि पुन्हा तेच कारण सांगितले. पण त्यानंतर पतीचा फोन सतत बंद येऊ लागल्याने पत्नीची चिंता वाढली. अखेर तिने सहार पोलीस ठाण्यात धाव घेत पतीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला.

अपहरणाची एफआयआर दाखल झाल्यानंतर संबंधित व्यावसायिक स्वतः सहार पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर त्याने खरे कारण सांगितले. इमिग्रेशनच्या अडचणीबाबत पत्नीला खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे. या प्रकरामुळे पत्नीला मात्र मोठा धक्का बसला आहे.

follow us