कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ अन् मयंक अग्रवालसह तब्बल 1,355 खेळाडूंची IPL 2026 च्या लिलावासाठी नोंदणी
IPL 2026 Auction : लवकरच आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव होणार आहे. यासाठी आतापर्यंत 1355 खेळाडूंनी नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
IPL 2026 Auction : लवकरच आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव होणार आहे. यासाठी आतापर्यंत 1355 खेळाडूंनी नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या लिस्टमध्ये भारतीय स्टार्ससह अनेक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव होणार आहे. मयंक अग्रवाल, केएस भरत, राहुल चहर, रवी बिश्नोई, आकाश दीप, दीपक हुडा, सरफराज खान, शिवम मावी, वेंकटेश अय्यर, चेतन सकारिया, कुलदीप सेन, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, उमेश यादव आणि संदीप वॉरियर हे प्रमुख भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी मिनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.
क्रिकबझकडे दिलेल्या माहितीनुसार, 1,355 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. 13 पानांची एक्सेल शीट इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भरलेली आहे. कॅमेरॉन ग्रीन, मॅथ्यू शॉर्ट आणि स्टीव्ह स्मिथ हे ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत ज्यांना खरेदीदार मिळण्याची अपेक्षा आहे. या यादीत इंग्लंडचे जेमी स्मिथ आणि जॉनी बेअरस्टो, न्यूझीलंडचे रचिन रवींद्र आणि श्रीलंकेचे वानिंदू हसरंगा आणि मथिशा पाथिराणा यांसारखे खेळाडू देखील आहेत.
नगरचे कारभारी कोण? आज ठरणार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरु
फक्त दोन भारतीय खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. एक फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि दुसरा वेंकटेश अय्यर आहे, ज्यांना केकेआरने मेगा लिलावात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीला खरेदी केले होते. 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईस ब्रॅकेटमध्ये 43 परदेशी खेळाडू आहेत, ज्यात कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, जेमी स्मिथ, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, कूपर कॉनोली, जेक फ्रेझर-मॅकगर्क, इंग्लिस, मुस्तफिजूर रहमान, गस अॅटकिन्सन, टॉम बँटन, टॉम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, डॅनियल लॉरेन्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मायकेल ब्रेसवेल, गेराल्ड कोएत्झी, लुंगी एनगिडी, अँरिक नॉर्टजे, मथिशा पाथिराना, महेश थीकशाना आणि वानिन्दू हसरंगा यांचा समावेश आहे. 10 संघांकडे 237.55 कोटी रुपये आहेत. 77 जागा रिक्त आहेत, त्यापैकी 31 परदेशी खेळाडूंसाठी आहेत.
