Asia Cup साठी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा पण ‘या’ 3 खेळाडूंना मिळणार नाही संधी

Asia Cup साठी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा पण ‘या’ 3 खेळाडूंना मिळणार नाही संधी

Asia Cup : क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आशिया कप 2025 साठी (Asia Cup 2025) भारतीय संघाची (Team India) घोषणा 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. बीसीसीआय (BCCI) आशिया कपसाठी कुणाला भारतीय संघात स्थान देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, आशिया कप 2025 साठी बीसीसीआय शेवटची टी-20 मालिका खेळलेल्या संघालाच कायम ठेवायचा विचार करत आहेत. निवडकर्त्यांनी आशिया कप संघात मागील टी-20 संघातील खेळाडूंवर लक्ष ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. तर फॉर्म आणि फिटनेसमुळे 3 खेळाडूंना संघात स्थान मिळणार नाही अशी देखील माहिती समोर आली आहे.

आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून सुरु होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) स्थान मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे मोहम्मद शमीला भारतीय संघात स्थान देण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे रिंकू सिंगला (Rinku Singh) देखील भारतीय संघात आशिया कपसाठी स्थान मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. रिंकू सिंगसाठी आयपीएल 2025 खराब ठरला होता. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील तो या हंगामात काही विशेष करु शकला नसल्याने त्याला आशिया कप 2025 साठी भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) देखील आशिया कप 2025 साठी संघात स्थान मिळणार नसल्याची चर्चा सध्या जोराने सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून रवी बिश्नोई खराब फॉर्मात असल्याने त्याला संघात स्थान मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube