Video : श्रीलंकन संघावर लाजिरवाणी वेळ; ‘टाईम आऊट’ होणारा अँजेलो मॅथ्यूज ठरला पहिला खेळाडू

Video : श्रीलंकन संघावर लाजिरवाणी वेळ; ‘टाईम आऊट’ होणारा अँजेलो मॅथ्यूज ठरला पहिला खेळाडू

दिल्लीत : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान श्रीलंकन (Sri Lanka) संघाला एका लाजिरवाण्या गोष्टीला सामोरे जावे लागले. यावरुन सामन्यादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला (Angelo Mathews) टाइमआउट घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे बाद होणारा अँजेलो मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरला आहे. (Angelo Mathews becoming the first batter to be timed out in international cricket)

नेमका काय प्रकार झाला?

समरविक्रमा झेलबाद झाल्यानंतर मॅथ्यूज क्रीजवर आला. मात्र मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून मैदानात पोहोचला होता. यानंतर त्याने योग्य हेल्मेट मागवून घेतले. मात्र या सगळ्या गोष्टीला 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळ झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाजाने दुखापतीमुळे मैदान सोडल्यानंतर पुढच्या फलंदाजाने तीन मिनिटांच्या आत पुढील बॉल खेळण्यासाठी येणे आवश्यक असते. जर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला तर त्या खेळाडूला ‘टाईम आऊट’ ठरवले जाते.

याच नियमाचा फायदा उचलत बांगलादेश संघाने मॅथ्यूजच्या या गोष्टीकडे अंपायरचे लक्ष वेधले आणि विकेटसाठी अपिल केले. अंपायर्सनेही चर्चा करुन नियमांची आणि मैदानावरील स्थितीची पडताळणी करुन मॅथ्यूजला बाद घोषित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे बाद होणारा अँजेलो मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरला आहे.

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधून श्रीलंका आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ बाहेर पडले आहेत. श्रीलंकन संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे तर बांगलादेश संघ नवव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास पात्र होण्यासाठी लढत आहेत. टॉप आठ टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतात.

https://twitter.com/aankjain/status/1721480014154096809

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन:

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन: तनजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, शकीब अल हसन (क), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, तंजीम हसन शाकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (डब्ल्यूके/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महिष थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, कसून राजिथा, दिलशान मधुशांका.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube