पाकिस्तानात परतल्यावर Babar Aazam घेणार मोठा निर्णय; म्हणाला मी…

पाकिस्तानात परतल्यावर Babar Aazam घेणार मोठा निर्णय; म्हणाला मी…

Babar Aazam : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Aazam)साठी आजचा दिवस महत्त्वाचा असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वात भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण बाबर आझम आपलं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील (ICC ODI World Cup)आपले आव्हान कायम राखतानाच उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan)आज, शनिवारी इंग्लंडविरुद्ध कडवी झूंज द्यावी लागणार आहे.

उत्तराखंडमध्ये पुढील आठवड्यात समान नागरी कायदा लागू होणार? लवकरच विशेष अधिवेशन

या दरम्यान कर्णधार बाबर आझम पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण या विश्वचषक स्पर्धेनंतर तो आपलं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतातून पाकिस्तानात परतल्यानंतर तो याबाबत आपला निर्णय जाहिर करू शकतो. असं पाकिस्तानमधील जिओ न्यूजकडून सांगण्यात आलं आहे.

अजितदादा-पवारांच्या भेटीत अनेक रहस्य, पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा खळबळजनक दावा

याबाबत बाबर आझम सध्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांच्यासह विद्यमान पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे. यावर बाबरला इंग्लंडविरुद्धच्या सामन्या अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला की, मी या अगोदर देखील कर्णधार पद सोडण्याबाबत बोललो आहे. तर पाकिस्तानला परत गेल्यावर यावर विचार करू सध्या माझं लक्ष आजच्या सामन्यावर आहे.

पाकिस्तानला आजचा सामना 287 धावांनी किंवा 284 बॉल राखून विजयश्री खेचून आणावाच लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोईन खान आणि शोएब मलिक (Shoaib Malik)काही पाकिस्तानच्या माजी कर्णधारांनी बाबरच्या कर्णधारपदावर उघडपणे टीका केली आहे. कर्णधारपदाच्या दबावाचा बाबर आझमच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचं या माजी कर्णधारांनी म्हटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube