उत्तराखंडमध्ये पुढील आठवड्यात समान नागरी कायदा लागू होणार? लवकरच विशेष अधिवेशन

  • Written By: Published:
उत्तराखंडमध्ये पुढील आठवड्यात समान नागरी कायदा लागू होणार? लवकरच विशेष अधिवेशन

Uniform Civil Law : आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळं देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने समान नागरी कायद्याच्या (Uniform Civil Law) अंमलबजावणीसाठी नागरिकांकडून मतं मागवली होती. दरम्यान आता उत्तराखंडमधील भाजपशासित सरकारने या संदर्भात राज्य पातळीवर मोठे पाऊल उचलले आहे. उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी याबाबत बोलतांना सांगितलं की, राज्यात समान नागरी संहिता लवकरच लागू केली जाईल.

अजितदादा-पवारांच्या भेटीत अनेक रहस्य, पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा खळबळजनक दावा 

उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यात आला आहे. आता धामी सरकार त्याची कायदेशीर अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास, पुढील आठवड्यात UCC लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनेल.

उत्तराखंडच्या भाजप सरकारने UCC संदर्भात न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने लोकांशी चर्चा करून अहवालाचा मसुदा तयार केला आहे. मसुदा अहवालात राज्यात विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तक यांसारख्या बाबी कशा हाताळल्या जातील, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समिती येत्या एक ते दोन दिवसांत अहवालाचा मसुदा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना सादर करणार आहे.

‘त्या चौघांना आसारामप्रमाणे आयुष्यभर तुरुंगात ठेवा” : सुसाईड नोट लिहून ब्रह्मा कुमारी बहिणींची आत्महत्या 

या अहवालाचा अभ्यास करून पुढील आठवड्यात दिवाळीनंतर उत्तराखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या विधेयकावर सभागृहात चर्चा होऊन ते मंजूर केले जाईल. नंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर तो कायदा होईल.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

दोन दिवसांपूर्वी उत्तराखंड स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री धामी यांनीही यूसीसीबाबत मोठे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, समान नागरी संहितेचा मसुदा जवळपास तयार झाला आहे. आपल्या राज्याला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. 23 व्या वर्षात उत्तराखंडने धर्मांतर विरोधी कायद्यांची अंमलबजावणी केली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण दिले आहे. आता समान नागरी संहितेचा मसुदा जवळपास तयार झाला आहे. तो लागू करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचं धामी म्हणाले.

गुजरातमध्येही यूसीसी लागू करण्याची तयारी

समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड लवकरच देशातील पहिले राज्य बनेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर उत्तराखंडच्या धर्तीवर गुजरातमध्येही समान नागरी संहिता लागू करण्याची तयारी सुरू आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेथे समान नागरी कायदा लागू केला जाऊ शकतो. UCC लागू करणारे गुजरात हे दुसरे राज्य बनेल.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube