BCCI कडून मास्टर ब्लास्टरला जीवन गौरव; मुंबईत सोहळ्याला आजी-माजी खेळाडूंची मांदीयाळी

BCCI कडून मास्टर ब्लास्टरला जीवन गौरव; मुंबईत सोहळ्याला आजी-माजी खेळाडूंची मांदीयाळी

BCCI Award Mumbai : दरवर्षी पार पडणारा बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबईमध्ये पार पडला. या सोहळ्याला अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित होते. त्याचबरोबर रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघामध्ये t20 मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाचे खेळाडू देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.

Union Budget 2025: पगारदारांसाठी बजेट गेमचेंजर ! पण रुपया कसा येणार आणि कसा जाणार ?

या पुरस्कार सोहळ्यामध्ये 2023-24 या वर्षातील हंगामामध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारांमध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख असलेला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला सी. के. नायडू यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नगर – सुपा MIDC मधील अतिक्रमण काढा, पालकमंत्री विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये

सचिन तेंडुलकर हा भारतातीलच नाहीतर जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याच्या नावावर अनेक विक्रमांचे ही विक्रम नोंदवले गेलेले आहेत. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने 2011 मध्ये मायदेशात आणि त्याच्याच मुंबईत विश्वविजेते पदाचं भारताचे स्वप्न साकार करण्याचे नेतृत्व पार पाडलं होतं.

https://x.com/BCCI/status/1885708214207234176?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1885708214207234176%7Ctwgr%5E3add130e5e70e25755fcd8cf2d6fccb9ede6c07d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fsakal-epaper-dh815b3a6ae20d4f358d091306c8bed72b%2Fbcciawardssachinalajivanagauravtarbumarahmanadhanasarvottamkheladupahavijetyanchisampurnlist-newsid-n650172731

तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरुष खेळाडूंसाठी दिला जाणारा पॉली उम्रीगर पुरस्कार तर महिलांचा खेळाडू म्हणून स्मृती मानधनाला देण्यात आला. त्याचबरोबर बुमराला आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून देखील गौरविण्यात आले आहे. स्मृती मानधनालाही नुकतचं आयसीसीचा सर्वोत्कृष्ट वन डे महिला क्रिकेटपटू, आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वाधिक धावांसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे.

तसेच या पुरस्कारांच्या यादीमध्ये सर्फराज खान आणि अशा शोभनाला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण तनुष कोटीयनला सर्वोत्तम देशांतर्गत अष्टपैलू क्रिकेटपटू, दिप्ती शर्मा- आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वाधिक विकेट्स,आर अश्विन – बीसीसीआय विशेष पुरस्कार, विष्णू भारद्वाज – एमए चिदंबरम ट्रॉफी, काव्या तेवोतिया – एमए चिदंबरम ट्रॉफी, ईश्वरी अवसरे – जगमोहन दालमिया ट्रॉफी (ज्यूनियर देशांतर्गत क्रिकेटपटू), प्रिया मिश्रा – जगमोहन दालमिया ट्रॉफी ( सिनियर देशांतर्गत वनडे क्रिकेटपटू), एच जग्गनाथ- जगमोहन दालमिया ट्रॉफी (U16 विजय मर्चंड ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स), एल रायचंदानी – जगमोहन दालमिया ट्रॉफी (U16 विजय मर्चंड ट्रॉफी सर्वाधिक धावा),

नेईझेको रुप्रओ- एमए चिदंबरम ट्रॉफी (U23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स प्लेट ग्रुप), पी विद्युत, हेम छेत्री- एमए चिदंबरम ट्रॉफी (U23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स एलिट ग्रुप),
अनिश केव्ही- एमए चिदंबरम ट्रॉफी (U23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी सर्वाधिक धावा एलिट ग्रुप), तनय त्यागराजन- माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स प्लेट ग्रुप), अग्नी चोप्रा- माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक धावा प्लेट ग्रुप), आर. साई किशोर- माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स एलिट ग्रुप), रिकी भूई- माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक धावा एलिट ग्रुप), शशांक सिंग- लाला अमरनाथ पुरस्कार (मर्यादीत षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू), अक्षय तोत्रे-देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पंच, सर्वोत्तम संघ – मुंबई

follow us
  • fb
  • instagram
  • youtube