World Cup 2027 पूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय; अजित आगरकर ठरवणार ‘टीम इंडिया’ चे भवितव्य
World Cup 2027 : बीसीसीआयने 2027 विश्वचषकापूर्वी मोठा निर्णय घेत भारतीय संघाचे मुख्य निवडर्ता अजित आगकर यांचा कार्यकाळ वाढवण्याचा
World Cup 2027 : बीसीसीआयने 2027 विश्वचषकापूर्वी मोठा निर्णय घेत भारतीय संघाचे मुख्य निवडर्ता अजित आगकर यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काही अहवालात करण्यात येत आहे. टी20 विश्वचषक 2024 आणि 2026 मध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी केल्याने बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला असल्याचा दावा माध्यमांमध्ये करण्यात येत आहे.
बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 2027 च्या विश्वचषकात (World Cup 2027) दिसणार की नाही याचा निर्णय देखील अजित आगकर करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ ने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने (BCCI) मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवला आहे.
🚨 AJIT AGARKAR CONTRACT EXTENDED. 🚨
– The BCCI has extended Ajit Agarkar’s contract till June 2027. 📑
Agarkar’s initial contract expires in June this year. (Express Sports). pic.twitter.com/dwxyflb8ud
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 19, 2026
आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 मध्ये संपणार होता मात्र ते आता 2027 पर्यंत भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता असणार आहे. आतापर्यंत आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने टी20 आणि एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी केली आहे.मात्र कसोटी सामन्यात भारताला हवं तसं यश मिळालेला नाही.
होर्मुझमधील गोळीबारावर इराणचे स्पष्टीकरण; युद्ध नको, संवादातून तोडगा काढण्याचा आग्रह
तर दुसरीकडे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा कार्यकाळही 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत असणार आहे. त्यामुळे, टीम इंडियाशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी आता अजित आगरकर आणि गौतम गंभीर या जोडीवर असेल. अजित आगरकर यांच्याव्यतिरिक्त, निवड समितीचे इतर सदस्यही जून 2027 पर्यंत आपापल्या पदांवर कायम राहणार आहेत.