वर्षभरानंतर बुमराहचे दणक्यात पुनरागमन, भारतापुढे 140 धावांचे आव्हान

वर्षभरानंतर बुमराहचे दणक्यात पुनरागमन, भारतापुढे 140 धावांचे आव्हान

IND vs IRE : पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 गडी गमावून 139 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्याच षटकापासून भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्याच षटकात दोन बळी घेतले.

आयर्लंडने एका वेळी अवघ्या 31 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या, मात्र त्यानंतरही यजमान संघ 139 धावापर्यंत मजल मारली. बॅरी मॅकार्थीने आयर्लंडसाठी सामन्याचे चित्र फिरवले. त्याने अवघ्या 33 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार निघाले.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली. माजी कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला, पण पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने त्याला बोल्ड केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला यष्टिरक्षक लॉर्कन टकरही पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद झाला.

कट्टर विरोधक धनंजय महाडिक आणि ऋतुराज पाटील एकाच मंचावर; अनेकांच्या भुवया उंचावल्या

यानंतर आयर्लंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. आयर्लंडचा निम्मा संघ केवळ 31 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यादरम्यान अँड्र्यू बालबर्नी 04, लॉर्कन टकर 00, हॅरी टेक्टर 09, पॉल स्टर्लिंग 11 आणि जॉर्ज डॉकरेल 01 धावा करून बाद झाले.

यानंतर कर्टिस कॅम्फर आणि मार्क एडेअर यांनी आघाडी घेतली, पण एकूण 59 धावांवर आयर्लंडची सहावी विकेटही पडली. 16 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 16 धावा करून अडायर बाद झाला. रवी बिश्नोईने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

शरद पवारांच्या टीकेला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर! म्हणाले, ‘देवाने भक्ताला मनातून काढलं पण..,’

मात्र, यानंतर बॅरी मॅकार्थी आणि कर्टिस कॅम्फर यांनी सातव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात आयर्लंडच्या फलंदाजांनी वेगवान धावा केल्या. कर्टिस कॅम्फरने 33 चेंडूंत एक षटकार आणि तीन चौकारांसह 39 धावा केल्या. त्याचवेळी बॅरी मॅकार्थीने अवघ्या 33 चेंडूंमध्ये झंझावाती अर्धशतक झळकावत संघाची धावसंख्या 139 पर्यंत पोहोचवली. मॅकार्थीच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार निघाले.

वर्षभरातनंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराह, पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीपला एक विकेट मिळाली. वॉशिंगटन सुंदर आणि शिवम दुबे यांना एकही विकेट मिळाली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube