बीसीसीआयने पाकिस्तानला दिला मोठा धक्का! आता बाबर आझमची टीम…

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 06 27 At 3.40.14 AM

क्रिकेट विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी फेटाळून लावली आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय आणि आयसीसीला आपल्या काही सामन्यांची ठिकाणे बदलण्याची विनंती केली होती, मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने शेजारी देशाला दणका दिला आहे. (cci-reject-demands-for-change-in-venues-for-australia-afghanistan-matches-in-world-cup-2023)

ICC आणि BCCI ने पाकिस्तानला दिला दणका!

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूच्या मैदानावर उतरणार आहे.तसेच चेन्नईतील चेपॉक येथे अफगाणिस्तानशी भिडणार आहे. खरं तर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयला या दोन्ही सामन्यांची ठिकाणे बदलण्याची विनंती केली होती, परंतु या मागणीकडे लक्ष दिले गेले नाही. म्हणजे आता पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना बेंगळुरूमध्ये ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे. तर पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना चेन्नईतच होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानचे संघ अहमदाबादमध्ये १५ ऑक्टोबरला आमनेसामने असतील.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना…

उल्लेखनीय म्हणजे, भारतीय संघाची 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानशी लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. त्याचवेळी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना पाहण्यासाठी 1 लाखांहून अधिक चाहते स्टेडियममध्ये येऊ शकतात, असा विश्वास आहे.

 

Tags

follow us