Yuzvendra Chahal : विकेट घेताच चहल बनला विक्रमवीर
लखनऊ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी या मैदानावर पार पडला.या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात युजवेंद्र चहलने एक विकेट घेताच विक्रम रचला.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रम चहलने आपल्या नावावर केलाआहे. चहलने ७५ व्या सामन्यात ९१ विकेट घेतल्या. या आगोदर भुवीने ८७ सामन्यात ९० विकेट घेतल्या आहेत. या सामन्यात चहलने २ षटकात फक्त ४ धावा देत १ विकेट घेतली.
दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडचा कर्णधार मिचलस सेंटनरने नाणेफेक जिकंत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडला फक्त ९९ धावा करता आल्या. फिन एलेन आणि डेवोन कॉन्वे यांनी न्यूझीलंडची सुरूवात आक्रमक केली. अशातच कर्णधार हार्दिक पंड्याने युजवेंद्र चहलकला षटक टाकण्यासाठी आमंत्रित केले.
चहलने आपल्या पहिल्याच चेंडूवर फिन एलेनला बोल्ड केले. फिनने १० चेंडूत ११ धावा केल्या. आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये चहले धाव न देता एक विकेट मिळवली.
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला विजयासाठी १०० धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य भारताने १९.५ षटकात पार केले. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक २६ धावा केल्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील निर्णायक सामना १ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळला जाणार आहे.