Vinesh Phogat : विनेश फोगटला जीवे मारण्याची धमकी
मुंबई : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. यानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाकडून 72 तासांत उत्तर मागितले आहे. तसे न केल्यास कुस्ती संघटनेवर कारवाई केली जाईल. मंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत लखनौमधील महिला कुस्ती शिबिरही रद्द केले आहे.
लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात अनेक प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंचे शोषण होत असल्याचा दावा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती आणि ऑलिम्पियन विनेश फोगाटने केला. त्यांनी आरोप केला की शिबिरात काही महिला आहेत ज्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या सांगण्यावरून कुस्तीपटूंशी संपर्क साधतात.
28 वर्षीय कुस्तीपटू फोगाटने स्पष्टीकरण दिले की तिला स्वतःला अशा प्रकारच्या अत्याचाराचा सामना करावा लागला नाही. विनेश इतकी नाराज होती की तिने तीन महिन्यांपूर्वी टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंपैकी एक बजरंग पुनिया यांनी सांगितले की, आम्ही गृहमंत्र्यांना भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला न्याय मिळेल. विनेशने दावा केला की ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या सांगण्यावरून तिला तिच्या जवळच्या अधिकार्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या कारण तिने टोकियो ऑलिम्पिक खेळांनंतर झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्याचे धाडस केले होते.
विनेश म्हणाली- टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवानंतर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग अध्यक्षांनी मला ‘खोटे नाणे’ म्हटले. मानसिक छळ केला. मी रोज आयुष्य संपवण्याचा विचार करायचे. कोणत्याही कुस्तीपटूला काही झाले तर त्याची जबाबदारी ब्रिजभूषण शरण सिंग अध्यक्षांवर असेल.
तर मी स्वतःला फाशी देईन
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले – विनेश फोगटचे आरोप निराधार आहेत. त्याच्याकडे आरोपांचे कोणतेही पुरावे नाहीत. कोणी पीडित असेल तर पुराव्यासह माझ्यासमोर या. आरोप खरे असतील तर मला फाशी होईल.