इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा सर्जिकल स्ट्राईक : वर्ल्ड-कप टीममधील 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा सर्जिकल स्ट्राईक : वर्ल्ड-कप टीममधील 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता

England Team : पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी इंग्लंडने (England) आपला संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात संघाची कमान जोस बटलरकडेच कायम ठेवण्यात आली आहे. मात्र इंग्लंडने या संघातून विश्वचषक संघातील तब्बल नऊ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जो रूट अशा तब्बल नऊ स्टार खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळण्यात आले आहे.  (England’s nine star players were dropped from the West Indies tour)

विश्वचषकात इंग्लंडची कामगिरी अत्यंत निराशजनक राहिली. गतविजेत्या संघ यंदा विश्वषकात साखळी फेरीतच गारद झाला होता. 9 पैकी अवघे तीन सामने जिंकण्यात इंग्लंडला यश आले होते. यातही पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकत इंग्लंडला कसेबसे चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकीट मिळाले. याच सुमार कामगिरीनंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीममधील नऊ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत अन्य खेळाडूंना संधी दिली आहे.

World Cup 2023 : पाकिस्तानचे वर्ल्डकपमधून पॅकअप ! विजयी इंग्लंडला चॅम्पियन ट्रॉफीचे तिकीट

वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंड तीन एकदिवसीय पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील 3 डिसेंबरपासून एकदिवस आणि 12 डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही.

एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, हॅरी ब्रूक, ब्रेंडन कारसे, जॅक क्रॉली, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, ऑली पोप, फिल सॉल्ट , जोश तुंग आणि जॉन टर्नर.

टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गस ऍटकिन्सन, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग , रीस टोपली, जॉन टर्नर आणि ख्रिस वोक्स.

इंग्लंड-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :

3 डिसेंबर- पहिली वनडे (अँटिग्वा)

6 डिसेंबर- दुसरी वनडे (अँटिगा)

9 डिसेंबर – तिसरी वनडे (बार्बाडोस)

इंग्लंड-वेस्ट इंडिज T20 मालिकेचे वेळापत्रक :

12 डिसेंबर- पहिली टी-20

14 डिसेंबर- दुसरी टी-20

16 डिसेंबर- तिसरी टी-20

19 डिसेंबर- चौथी टी-20

21 डिसेंबर- पाचवी टी-20

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube