Ranji Trophy: हात मोडला तरी ‘त्याने’ केली फलंदाजी
मुंबई : आंध्र प्रदेशच्या हनुमा विहारीने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात आपल्या जिद्द आणि लढाऊ भावनेने सर्वांची मने जिंकली. मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात हनुमा विहारीचे हात फ्रॅक्चर झाला असताना देखील. डाव्या हाताने फलंदाजी करत वेगवान गोलंदाजांना चौकार खेचले.
हनुमा विहारीने सिडनी कसोटीची आठवण करून दिली. तेव्हा त्याने अश्विनच्या साथीने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वाचवला. या सामन्यादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. असे असतानाही त्याने फलंदाजी सुरू ठेवली आणि भारताचा पराभव टाळला होता.
मध्य प्रदेश विरुद्धच्या रणजी सामन्यात विहारीचा डावा हात फ्रॅक्चर झाला होता. तो सहसा उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि त्याचा डावा हात समोर असतो, परंतु त्याच्या डावा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे तो समोर ठेवू शकला नाही. अशा स्थितीत तो डाव्या हाताने फलंदाजी करत उभा राहिला आणि पाठीमागे डावा हात लपवला. तो फक्त उजवा हात पुढे करत फलंदाजी करत राहिला त्याने तीन चौकारा च्या मदतीने तब्बल 27 धावांची खेळी साकारली.
या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 37 चेंडूत 16 धावा केल्या. यानंतर तो जखमी झाला. स्कॅन केल्यानंतर तो पाच ते सहा आठवडे क्रिकेटपासून दूर असल्याचे दिसून आले. अशा स्थितीत विहारी गरज असेल तेव्हाच फलंदाजी करतील, असा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला.
आंध्र प्रदेशकडून सुरुवातीला रिकी भुई (149) आणि करण शिंदे (110) यांनी धावा केल्या. अशा स्थितीत विहारीला फलंदाजीला येण्याची गरजच नव्हती, पण हे दोघेही बाद होताच आंध्र प्रदेश संघाचा धुव्वा उडाला. अशा स्थितीत विहारी दुसऱ्यांदा फलंदाजीला आला. डाव्या हाताने फलंदाजी करत त्याने आपली वैयक्तिक धावसंख्या 27 धावांपर्यंत पोहोचवली. आंध्र प्रदेशने पहिल्या डावात 379 धावा केल्या.
विहारीचा आतापर्यंतचा हंगाम संमिश्र राहिला असून त्याने 13 डावांत 39.58 च्या सरासरीने दोन अर्धशतकांच्या मदतीने 475 धावा केल्या आहेत.