IND vs AUS : गिल आणि रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा, तिसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होणार

  • Written By: Published:
IND vs AUS : गिल आणि रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा, तिसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होणार

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद 36 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला, ज्यामध्ये उस्मान ख्वाजाने 180 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी आर अश्विन भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 6 विकेट्स घेतल्या. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व चाहत्यांना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

शुभमन आणि रोहितवर असेल जबाबदारी

अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यांच्यावर असतील. या दोन्ही सलामीवीरांकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. अशा स्थितीत भारताला या सामन्यात टिकून राहावे लागेल आणि आपली स्थिती मजबूत करायची असेल तर सलामीवीरांना चांगली सुरुवात करावी लागेल. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 36 धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्मा 17 आणि शुभमन गिल नाबाद 18 धावांवर खेळत आहेत.

अश्विन सर्वाधिक 5 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.

आर अश्विनने कारकिर्दीत 32 वेळेस 5 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. या बाबतीत त्याने आता इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची बरोबरी केली आहे. दुसरीकडे, अश्विनच्या पुढे भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आहे, त्याने आपल्या कारकिर्दीत 35 वेळेस हा पराक्रम केला आहे. त्याच वेळी, अश्विन सध्या 859 रेटिंग गुणांसह जेम्स अँडरसनसह ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत संयुक्त पहिल्या स्थानावर आहे. पण पहिल्या डावातील अप्रतिम गोलंदाजीनंतर आता तो अँडरसनला मागे टाकेल आणि पहिल्या क्रमांकावर येईल.

प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (क), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनमन, टॉड मर्फी, नॅथन लियॉन

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube