FIFA World Cup 2026 ‘गोल्डन बूट’ साठी जोरदार लढत, मेस्सी की एमबाप्पे कोण मारणार बाजी?

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 मध्ये राउंड ऑफ 16 मधील सामने संपले असून आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे.

FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 मध्ये राउंड ऑफ 16 मधील सामने संपले असून आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आजपासून क्वार्टरफायनल सामन्यांची सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात असल्याने गोल्डन बूट पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राउंड ऑफ 16 नंतर गोल्डन बूटच्या शर्यतीत अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर  किलियन एम्बाप्पे तर तिसऱ्या क्रमांकावर एर्लिंग हालांड आहे.

‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत कोण आघाडीवर ?

अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी सध्या 8 गोल आणि एका ‘असिस्ट’सह या यादीत अव्वल स्थानावर आहे. फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे 7 गोल आणि 2 ‘असिस्ट’सह दुसऱ्या स्थानावर आहे. तर नॉर्वेचा एर्लिंग हालांडएर्लिंग हालांड 7 गोलसह तिसऱ्या आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन 6 गोलसह चौथ्या स्थानावर आहे.

फिफा विश्वचषक  2026 : सर्वाधिक गोल करणारे टॉप 10 खेळाडू

क्रमांक खेळाडू देश गोल असिस्ट
1 लिओनेल मेस्सी अर्जेंटिना 8 1
2 किलियन एमबाप्पे फ्रान्स 7 2
3 एर्लिंग हालांड नॉर्वे 7 0
4 हॅरी केन इंग्लंड 6 1
5 उस्मान डेम्बेले फ्रान्स 4 2
6 मिकेल ओयारझाबाल स्पेन 4 1
7 जूड बेलिंगहॅम इंग्लंड 4 1
8 जुलियन क्विनोनेस मेक्सिको 4 1
9 व्हिनिसियस ज्युनियर ब्राझील 4 1
10 इस्माईला सार सेनेगल 4 1

‘गोल्डन बूट’ विजेत्याची निवड कशी केली जाते?

स्पर्धेच्या अखेरीस सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला ‘गोल्डन बूट’ दिला जातो. अंतिम सामन्यानंतर हा पुरस्कार प्रदान केला जातो. सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंना ‘सिल्व्हर बूट’ आणि ‘ब्रॉन्झ बूट’ दिले जातात.

जर दोन किंवा अधिक खेळाडूंची गोलसंख्या समान असेल, तर विजेत्याचा निर्णय ‘असिस्ट’च्या संख्येवरून घेतला जातो. ज्या खेळाडूचे ‘असिस्ट’ सर्वाधिक असतात, तो खेळाडू हा पुरस्कार जिंकतो. ‘असिस्ट’चा विचार करूनही जर खेळाडूंची स्थिती समान राहिली, तर ज्या खेळाडूने सर्वात कमी खेळण्याच्या वेळेत (Playing Time) आपले गोल आणि ‘असिस्ट’ नोंदवले आहेत, त्याला ‘गोल्डन बूट’ दिला जातो.

मेस्सीने अद्याप जिंकलेला नाही ‘गोल्डन बूट’ किताब

स्टार खेळाडू मेस्सीने विश्वचषकाच्या इतिहासात कधीही ‘गोल्डन बूट’ किताब जिंकलेला नाही. मात्र यावेळी त्याच्याकडे संधी आहे. ‘गोल्डन बूट’ जिंकून मेस्सी आपल्या विश्वचषक कारकिर्दीची सांगता करेल, अशी आशा आहे.

2022 च्या विश्वचषकात ‘गोल्डन बूट’चा किताब कोणी जिंकला?

किलियन एम्बाप्पेने कतारमधील 2022 फिफा विश्वचषकात 8 गोल करून हा पुरस्कार जिंकला होता. तर 2018  मध्ये हॅरी केनने 6 गोलसह हा पुरस्कार जिंकला होता आणि कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जनेही 2014 मध्ये 6 गोल करून ‘गोल्डन बूट’चा किताब पटकावला होता.

मोशी दुर्घटना, अजूनही 8 ते 9 कामगार अडकल्याची भीती; युद्धपातळीवर बचावकार्य

फिफा विश्वचषक 2026 क्वार्टरफायनल सामने

9 जुलै : फ्रान्स विरुद्ध मोरोक्को

10 जुलै : स्पेन विरुद्ध बेल्जियम

11 जुलै : नॉर्वे विरुद्ध इंग्लंड

11 जुलै : अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड

follow us