FIFA World Cup रोनाल्डोला धक्का, काँगोच्या भक्कम बचावमुळे पोर्तुगाल- काँगो सामना ड्रॉ

FIFA World Cup : फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये डोमिनिकन रिपल्बिक काँगोने बलाढ्या पोर्तुगालला धक्का दिला आहे. तब्बल 52 वर्षांनंतर फुटबॉल

FIFA World Cup

FIFA World Cup : फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये डोमिनिकन रिपल्बिक काँगोने बलाढ्या पोर्तुगालला धक्का दिला आहे. तब्बल 52 वर्षांनंतर फुटबॉल विश्वचषकात पुनरागमन करणऱ्या काँगोने आपल्या शानदार बचावच्या जोरावर पोर्तुगालविरुद्ध सामना  1-1 अशा बरोबरीवर संपवला. हा सामना बरोबरीत सुटल्याने पोर्तुगालला फिफा विश्वचषक 2026 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करता आली नाही.

रोमांचक सामना

काँगो आणि पोर्तुगाल (Congo Vs Portugal) यांच्यातील सामना ह्युस्टन स्टेडियमवर खेळला गेला. सुरुवातीला पोर्तुगालने वर्चस्व गाजवले. सहाव्या मिनिटाला जोआओ नेव्हसने पहिला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पेड्रो नेटोच्या उत्कृष्ट ‘क्रॉस’वर नेव्हसने शानदार ‘हेडर’द्वारे गोल केला. यानंतर 0-1 ने पिछाडीवर पडल्यानंतर काँगोने जोरदार प्रयत्न केले, परंतु पहिल्या हाफच्या बहुतांश वेळात त्यांना गोल करता आला नाही. मात्र, पहिल्या हाफच्या ‘स्टॉपेज टाइम’मध्ये (अतिरिक्त वेळेत), आर्थर मासुअकूच्या अचूक ‘क्रॉस’वर योआने विसाने जोरदार ‘हेडर’ मारून गोल केला आणि सामना 1-1 वर आणला.   त्यानंतर पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) संघाला पुन्हा आघाडी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु काँगोच्या खंबीर बचावफळीला भेदण्यात त्याला अपयश आले.

दुसऱ्या हाफमध्ये जोआओ कॅन्सेलोने शानदार ‘ओव्हरहेड किक’द्वारे गोल केला, परंतु ‘ऑफसाइड’ स्थितीमुळे पंचांनी तो गोल अमान्य केला. पोर्तुगालने डीआर काँगोच्या बचावफळीला भेदण्याचे विविध प्रयत्न केले, परंतु काँगोच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा गोल होऊ दिला नाही.

‘बंडखोरांना तुडवा’ संजय राऊतांच्या विधानानंतर 6 खासदारांना Y+ सुरक्षा-

रोनाल्डोचा विक्रम 

काँगोविरुद्धच्या या सामन्यात रोनाल्डोने एक मोठा विक्रम प्रस्थापित केला; फिफा विश्वचषक सामन्यात सुरुवात (स्टार्ट) करणारा तो वयाच्या 41 वर्षे आणि 132 दिवसांचा सर्वात वयस्कर ‘आउटफील्ड’ खेळाडू ठरला. तसेच, रोनाल्डोच्या कारकिर्दीतील हा 23 वा विश्वचषक सामना होता. यासह त्याने इटलीचे दिग्गज खेळाडू पाओलो माल्दिनी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, ज्यांनी एकूण 23 विश्वचषक सामने खेळले होते. आपला पुढील सामना खेळताच रोनाल्डो हा विक्रम मागे टाकेल

follow us