हार्दिक-नताशाच्या मित्राकडून घटस्फोटावर मोठा खुलासा; म्हणाला, दोघं अनेक महिन्यांपासून…

हार्दिक-नताशाच्या मित्राकडून घटस्फोटावर मोठा खुलासा; म्हणाला, दोघं अनेक महिन्यांपासून…

Hardik Natasha Divorce :  गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरलाय. सध्या तर या प्रकरणात रोज काही ना काही नवीन माहिती समोर येत आहे. आता हार्दिक आणि नताशाच्या एका जवळच्या मित्राने एका मुलाखतीत बोलताना मोठा खुलासा केलाय. (Hardik Natasha ) तो म्हणतो, हे जोडपं मागील अनेक महिन्यांपासून वेगळं राहत आहे. सध्या तरी त्यांच्या नात्यात कटूता निर्माण झालेली आहे असं हा मित्र म्हणाला. दरम्यान, हार्दिक किंवा नताशा या दोघांनीही घटस्फोट प्रकरणावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

Hardik Pandya : वासे फिरले! घटस्फोट होताच पोटगी म्हणून; देणार इतकी संपत्ती

2020 मध्ये लग्न

घटस्फोट या चर्चेला सुरूवात झाली ती नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘पंड्या’ हे आपल आडनाव काढून टाकल्यानंतर. तसंच, तीने तिच्या अकाऊंटवरून अनेक फोटो डिलीट केले ज्यामध्ये हार्दिक आणि ती दिसत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काही ठीक चाललेलं नाही हे समोर आलं आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचं 2020 मध्ये लग्न झालेलं आहे. या दोघांनाही अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

पुन्हा राहू लागतील

हार्दिक आणि नताशाच्या एका जवळच्या मित्राने एका माध्यमात मुलाखतीत दिली. त्यावेळी त्याने हार्दिक पंड्या आणि नताशा यांच्यावर भाष्य केलं. तो म्हणाला, अनेक महिन्यांपासून हे दोघं वेगळं राहत आहेत आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात ते खरोखरच अनेक समस्यांचा सामना करत आहेत. नताशा हार्दिकसोबत राहत नाही. तसंच, ते एकत्र पुन्हा राहू लागतील की नाही माहिती नाही. कदाचित येतीलही असंही हा मित्र म्हणाला आहे.

हार्दिक पंड्या भारतीय संघात दाखल

नुकतीच भारतीय संघाची पहिली तुकडी 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे आणि राखीव खेळाडू शुभमन गिल आणि खलील अहमद यांचा समावेश आहे. मात्र, हार्दिक पंड्या आयपीएल 2024 चा हंगाम संपल्यानंतर अज्ञात ठिकाणी कुठेतरी गेल्याची चर्चा सुरू होती. हार्दिक थेट वर्ल्डकप संघामध्ये सहभागी होईल असं म्हटलं जात आहे. आता पहिल्या सराव सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या भारतीय संघात दाखल झाल्याची पोस्ट त्याने स्वत शेअर केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube