मोठी बातमी, आशिया कपमध्ये खेळणार नाही पाकिस्तान, ‘या’ संघाची एन्ट्री होणार
Asia Cup 2025 : सप्टेंबरमध्ये सुरु होणाऱ्या आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघ खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी

Asia Cup 2025 : सप्टेंबरमध्ये सुरु होणाऱ्या आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघ खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तानशी (INDVsPAK) भिडणार आहे. तर दुसरीकडे 29 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या हॉकी आशिया कप 2025 (Hockey Asia Cup) बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेत पाकिस्तान सहभागी होणार नाही. 2025 हॉकी आशिया कप भारतात होत असल्याने पाकिस्तान संघाने या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणावरुन पाकिस्तान संघाने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या हॉकी आशिया कप 2025 स्पर्धा पाकिस्ताशिवाय खेळली जाणार आहे. आशियाई हॉकी महासंघाने बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या या 12 व्या आशिया चषक हॉकीच्या अंतिम वेळापत्रकालाही मान्यता दिली आहे.
पाकिस्तान खेळणार नाही
हॉकी 2025 आशिया कपमध्ये पाकिस्तान खेळणार नसल्याची पुष्टी आशियाई हॉकी महासंघाने केली आहे. गतविजेता पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला असल्याची माहिती आशियाई हॉकी महासंघाने दिली आहे. भारत पाकिस्तानचे यजमानपद भूषविण्यास तयार आहे पण पाकिस्तानने स्वत:हून येण्यास नकार दिला आहे. असं हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप कुमार तिर्की (Dilip Kumar Tirkey) म्हणाले.
तर दुसरीकडे पाकिस्तनासह ओमानने देखील या स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारत, जपान आणि चीनसह पूल अ मध्ये ओमानची जागा कझाकिस्तानने घेतली, तर मलेशिया, कोरिया आणि चायनीज तैपेईसह पूल ब मध्ये पाकिस्तानची जागा बांगलादेशने घेतली. ग्रुप स्टेजनंतर, सुपर-4 राउंड 3 सप्टेंबरपासून सुरू होईल, ज्यामध्ये प्रत्येक पूलमधील टॉप-2 संघ पुढे जातील. या स्पर्धेत विजय होणारा संघ पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या विश्वचषकात थेट पात्र होणार आहे.
Schedule for Asia Cup Men’s Hockey in India announced | India, Japan, China, Kazakhstan in Pool A. Malaysia, Korea, Bangladesh and Chinese Taipei in Pool B. pic.twitter.com/AbPRu7ChLq
— ANI (@ANI) August 19, 2025
भारताने संघ जाहीर केला
भारताने या स्पर्धेसाठी आपला 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे.
गोलकिपर : कृष्ण पाठक, सूरज करकेरा.
डिफेंडर : सुमित, जर्मनप्रीत सिंग, संजय, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग.
मिडफील्डर: राजिंदर सिंग, राजकुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद.
फॉरवर्ड्स : मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा, अभिषेक, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग.
स्टँडबाय: नीलम संजीव जेस, सेल्वम कार्ती.
धक्कादायक, ताटात उष्टे अन्न ठेवल्याने मुलाकडून वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या